नाशिक

जून महिना चालला तरी मेंढपाळांची चा ऱ्या साठी भटकंती

CD
पावसाळ्यातही मेंढपाळांची भटकंती कसमादेत चाऱ्याच्या शोधात स्थलांतर सकाळ वृत्तसेवा जुनी शेमळी, ता. २३ : जून महिना संपत आला तरी बागलाण तालुक्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. त्यामुळे चारा आणि पाण्याच्या शोधात मेंढपाळांना कुटुंबासह भटकंती करावी लागत असून, ज्या ठिकाणी चारा उपलब्ध होईल तेथे शेतात तात्पुरता मुक्काम करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल होत असला तरी परिसरात अपेक्षित पाऊस झालेला नाही. तालुक्यातील काही भागांत रविवारी (ता. २२) हलका पाऊस झाला; मात्र जुनी शेमळी परिसरात उन्हाची तीव्रता कायम आहे. परिणामी हिरवा चारा उपलब्ध नसल्याने मेंढपाळांना मेंढ्यांसह एका गावातून दुसऱ्या गावाकडे स्थलांतर करावे लागत आहे. मेंढपाळ कुटुंबे लहान मुलांसह घोडे, चारचाकी रिक्षा, ट्रॅक्टर तसेच बैलगाड्यांमधून प्रवास करत आहेत. डोक्यावर कडक ऊन असतानाही चारा व पाण्याच्या शोधात त्यांची भटकंती सुरू आहे. ज्या ठिकाणी मेंढ्यांसाठी चारा उपलब्ध होईल, तेथे काही दिवस मुक्काम करून पुढील प्रवास केला जात आहे. पावसाअभावी शेतांमध्ये हिरवळ दिसत नसल्याने मेंढपाळांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. दुसरीकडे, जून महिना सुरू होऊनही उष्णतेचा प्रभाव कायम असल्याने रस्त्यांलगत थंड पेयांची दुकाने अद्याप सुरू आहेत. शेतकरी आणि मेंढपाळ दोघेही आता पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. प्रतिक्रिया "पाऊस नसल्याने हिरवा चारा उपलब्ध होत नाही. त्यामुळे परिसरातील विविध गावांमध्ये जिथे चारा मिळेल, तेथे मेंढ्या चाराव्या लागतात. एखाद्या ठिकाणचा चारा संपला की पुन्हा पुढील प्रवास करावा लागतो." - प्रभाकर सोनवणे, मेंढपाळ, किरातवाडी किरातवाडी : संसार घोड्यावर घेऊन मेंढ्यांना चारायला नेताना मेंढपाळ.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अभिजीत दीपकेंना विचारलं- देशाचा बेस्ट PM कोण? क्षणाचाही विलंब न करता घेतलं 'या' नेत्याचं नाव; बेस्ट CM साठी घेतली तीन नावं

Bidkin News: बिडकीनच्या DMIC हद्दीत अज्ञात महिलेचा संशयास्पद मृतदेह; घातपाताचा संशय, पोलिस तपास सुरू

CNG-PNG महागणार? शेणापासून तयार होणाऱ्या CBG ची किंमत वाढली; ग्राहकांच्या खिशावर कसा परिणाम होणार?

Amravati Hospital Fire : निधी नव्हता म्हणून फायर ऑडिटला विलंब, अमरावतीतील रुग्णालयाबाबत धक्कादायक माहिती समोर

Pune Court: न्यायसेवेतील प्रदीर्घ अनुभव पुण्याच्या न्यायालयाच्या कामी; अंजू शेंडे यांनी स्वीकारला प्रमुख न्यायाधीशपदाचा पदभार

SCROLL FOR NEXT