नाशिक

तरूणाचे नेत्रदान ; अंधाना मिळणार नजर

CD
फोटो : H19253 सतरा वर्षीय युवकाचे नेत्रदान दोन दृष्टहिनांना मिळणार नवी दृष्टी सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. १५ : सातपूर श्रमिकनगर येथील सतरा वर्षीय चेतन ईश्वर पाटील तरुणाचा अपघाती मृत्यू झाला. त्याच्या कुटुंबीयांनी दुःखावर मात करत नेत्रदानासारखा प्रेरणादायी निर्णय घेत माणुसकीचा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. चेतनच्या नेत्रदानामुळे दोन अंध व्यक्तींना नवीन दृष्टी मिळणार असल्याने ‘मरावे परी दृष्टिरूपी उरावे’ असा संदेश पाटील कुटुंबीयांनी दिला आहे. चेतन याने नुकतेच बारावीला वाणिज्य शाखेतून ७७ टक्के गुण मिळवले होते. तसेच काही दिवसांपूर्वी सीईटी परीक्षाही दिली होती. कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्याने त्याचे वडील ईश्वर पाटील घंटागाडी चालक म्हणून काम करीत होते. चेतनला कुटुंबासाठी आर्थिक हातभार लावायचा होता म्हणून तो मित्रासोबत नोकरीच्या शोधात बाहेर पडला होता. मात्र, १३ मेस सकाळी दहाच्या सुमारास कार्बन नाका परिसरातून आपल्या दुचाकीने जात असताना भरधाव आयशरने जोरदार धडक दिल्याने चेतन व त्याचा मित्र गंभीर जखमी झाले. अपघातानंतर त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांकडून उपचार सुरू असताना चेतनची प्राणज्योत मालवली. चेतनला शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात आणण्यात आले. तेव्हा शासकीय रुग्णालयाचे डॉ. आयुषी जैन व डॉ. शशिकांत आवारी यांनी मृताच्या नातेवाईकांचे नेत्रदानाबाबत समुपदेशन केले. दुःखद प्रसंगी पाटील कुटुंबीयांनी नेत्रदानाचा निर्णय घेत शासकीय रुग्णालयाचे समुपदेशक सागर जाधव यांनी सुशील नेत्रपेढीचे समन्वयक राहुलदेव जाधव यांच्याशी संपर्क साधून नेत्रदानाची प्रक्रिया पार पडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suvendu Adhikari: बंगालचे मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी राजीनामा दिला; कोणती जागा सोडली? राजीनाम्यानंतर भावूक प्रतिक्रिया

राजवाडेंच्या पार्टीसाठी स्वानंदीचा हटके लूक, स्टायलिश गाऊनमध्ये तेजश्रीला पाहताच चाहते घायाळ, फोटो व्हायरल

Maharashtra Latest News Live : अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्याचं अनावरण; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं कार्याचं कौतुक

loan Recovery: थकीत कर्जवसुली प्रकरण तापले; सील केलेल्या मिळकतीत अनधिकृत प्रवेश, पोलिसांत तक्रार

Loni Kalbhor Crime: लोणी काळभोरमध्ये मोठी कारवाई; ५ लाखांचा प्रतिबंधित गुटखा जप्त, महिला आरोपीवर गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT