नाशिक

टुडे ३ साठी..अवतीभवती

CD
धुळे : टुडे पान ३ साठी..अवतीभवती -- फोटो क्रमांक : 22440 सांजोरी (ता. धुळे) : वैद्यकीय शिक्षण पूर्ण करणाऱ्या डॉ. भूषण पाटील आणि अभियंता धनश्री पाटील यांचा सत्कार करताना आमदार राम भदाणे. -- सांजोरीतील यशस्वी भावंडांचा गुणगौरव धुळे : सांजोरी (ता. धुळे) येथील माजी सरपंच मोतीराम आत्माराम पाटील यांचा नातू डॉ. भूषण राजेंद्र पाटील यांनी रशियातून वैद्यकीय शिक्षण पूर्ण केले तर नात अभियंता धनश्री राजेंद्र पाटील यांनी उच्च शिक्षण पूर्ण करून चांगल्या नोकरीची संधी मिळवली. या दोन्ही भावंडांचा सत्कार आमदार राम भदाणे यांच्या हस्ते झाला. शेतकरी कुटुंबातील मुलांनी घेतलेली ही झेप ग्रामीण भागातील इतर विद्यार्थ्यांसाठी नक्कीच दिशादर्शक ठरेल. जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर भूषण आणि धनश्री यांनी हे अभिमानास्पद यश मिळवले असून, त्यांनी आपल्या व्यवसायाच्या माध्यमातून गोरगरीब जनतेची सेवा करावी, असे प्रतिपादन आमदार भदाणे यांनी केले. या वेळी सतीश जाधव, दिलीप पाटील, माणिक पाटील, गणेश घुगे, रामू सनेर, अशोक सनेर, दीपक मोतीराम पाटील, भाऊसाहेब पाटील आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते. -- रावल अकॅडमीची लक्षवेधी कामगिरी धुळे : येथे झालेल्या जिल्हास्तरीय बॅडमिंटन निवड चाचणी स्पर्धेत दोंडाईचा येथील रावल बॅडमिंटन ॲकॅडमीच्या खेळाडूंनी उल्लेखनीय यश मिळवत लक्षवेधी कामगिरी केली. स्पर्धेत १७ वर्षांखालील एकेरी गटात हिमांशु चौधरी याने आक्रमक खेळ करीत अजिंक्यपद पटकावून सुवर्णपदक मिळवले. तसेच, त्याने मिक्स दुहेरी गटातही प्रभावी कामगिरी करत प्रथम क्रमांक पटकावला. १५ वर्षांखालील एकेरी गटात लक्ष्मण नाईक या होतकरू आदिवासी खेळाडूने शानदार खेळ करत रौप्यपदक जिंकले. त्याच्या या कामगिरीचे कौतुक झाले. ज्येष्ठ गटातही ॲकॅडमीचे खेळाडू मागे राहिले नाहीत. ३५ वर्षे पुढील गटात डॉ. निलेश पवार यांनी उप-उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. तर मुख्य प्रशिक्षक प्रशांत चौधरी यांनी ४५ वर्षे पुढील गटात उपांत्य फेरी गाठत खेळाडूंना प्रेरणा दिली. या यशाबद्दल ॲकॅडमीच्या सर्व खेळाडूंचे कौतुक झाले. -- जयहिंद शाळेत ज्ञानोत्सव उत्साहात धुळे : येथील जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभानिमित्त प्रवेशोत्सव आणि मोफत पाठ्यपुस्तक वितरण कार्यक्रम झाला. नव्या वर्षाच्या स्वागतासाठी शाळा परिसर फुलांची आरास, आकर्षक सजावट आणि रांगोळ्यांनी सजविण्यात आला होता. पहिल्याच दिवशी नव्याने प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत गुलाबपुष्प देऊन व ढोल-ताशांच्या गजरात करण्यात आले. मान्यवरांच्या हस्ते पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचे वाटप करण्यात आले. जयहिंद एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष विजय पाटील अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या माजी संचालिका तथा नगरसेविका प्रतिभा चौधरी, संचालक डॉ. नितीन काकडे उपस्थित होते. प्राचार्य डी. व्ही. निकम, उपमुख्याध्यापिका मीना पिंपळीस्कर, पर्यवेक्षिका श्रीमती ठींगळे, अनिता पाटील, एस. यू. पाटील आदींनी संयोजन केले. -- सूरमय सुरांनी रंगला ‘संगीत दिन’ धुळे : जागतिक संगीत दिनाचे औचित्य साधून येथील ‘पारिजात चव्हाण स्कुल ऑफ म्युझिक’च्या वतीने एका विशेष सांगितिक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमात अनेक नामांकित कलावंतांनी सुमधूर गायनाने रसिकांना मंत्रमुग्ध केले. संस्थेचे संचालक पारिजात चव्हाण यांच्यासह विकास चव्हाण, ॲड. गणेश कुलकर्णी, प्रा. अरुण विसपुते, माधव ठाकरे आणि सुरेश चत्रे यांनी गीते सादर केली. लेखाधिकारी किशोर जाधव, बापू सोनवणे, अजय शिंपी आणि गुलाब थोरात यांच्या गीतांनाही श्रोत्यांची दाद मिळाली. या मैफिलीत महिला कलाकारांचाही सहभाग होता. यात सुधा साळुंके, सुनंदा कुवर, अनुराधा पाटील, सोनाली लोखंडे, मीना खैरनार आणि डॉ. कविता सोनवणे आदी कलाकारांनी गायनातून स्वरमाउलीची सेवा करत संगीत दिन साजरा केला. --

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पासपोर्ट म्हणजे नागरिकत्वाचा पुरावा नाही; MEA कडून महत्त्वाचे स्पष्टीकरण, २७ देशांत भारतीयांना व्हिसा-फ्री प्रवेशाची घोषणा

IND vs ENG, T20I: एकट्या वैभव सूर्यवंशीसाठी इंग्लंडमध्ये वेगळी ड्रेसिंग रुम असणार! पण नेमकं यामागे खरं कारण काय?

Latest Marathi News Live Update : केडीएमसी महासभेत सभापतींचा अजब फतवा; इलेक्ट्रॉनिक माध्यमांना प्रवेशबंदी

निळावंतीचं रहस्य आणि गुप्त खजिन्याचा शोध! ब्रिटिशकालीन इतिहासावर आधारित 'इंद्रजाल'चा थरारक फर्स्ट लुक आउट

Solapur Water Rights: दुष्काळी १३ तालुक्यांसाठी ३४ वी पाणी संघर्ष परिषद २६ जूनला मंगळवेढ्यात

SCROLL FOR NEXT