नाशिक

मतदार यादी पुनर्निरीक्षणासाठी राष्ट्रवादीचा जिल्हाभर जागर

CD
मुख्य अंक पान ३ साठी ------------- ३०-२ मतदारयादी पुनरीक्षणासाठी राष्ट्रवादीचा जिल्हाभर जागर जिल्हाध्यक्ष खैरे यांचा २८ जूनपासून दौरा सकाळ वृत्तसेवा नाशिक, ता. २६ ः मतदार विशेष सखोल पुनरीक्षण मोहीम प्रभावीपणे राबविण्यासाठी व पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे जिल्हाभर जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. पक्षाचे नवनियुक्त जिल्हाध्यक्ष दिलीप खैरे २८ जूनपासून पुढील आठ दिवस जिल्ह्याचा दौरा करणार आहेत. या दौऱ्याची सुरुवात २८ जूनला होणार असून, सकाळी अकराला पिंपळगाव येथील भीमाशंकर इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आणि दुपारी तीनला अवनखेड (ता. दिंडोरी) येथील विघ्नेश्वर लॉन्समध्ये कार्यकर्ता बैठक घेण्यात येईल. मतदारयादीतील त्रुटी दूर करणे, पात्र नवमतदारांची नोंदणी, दुबार व मृत मतदारांची नावे वगळणे, पत्ते दुरुस्ती यांसारख्या बाबींवर या मोहिमेत भर दिला जाणार आहे. जिल्हाध्यक्ष खैरे स्वतः प्रत्येक विधानसभा मतदारसंघ, तालुका व शहर पातळीवर बैठका घेऊन पदाधिकाऱ्यांशी संवाद साधणार आहेत. विधानसभा अध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शहराध्यक्ष, विविध सेलचे प्रमुख, आघाड्यांचे पदाधिकारी व बूथ कमिटी सदस्यांना या मोहिमेची उद्दिष्टे व कार्यपद्धती समजावून सांगितली जाणार आहे. बूथस्तरावरील संघटन बळकट करणे, पक्षाची भूमिका घराघरांत पोहोचवणे आणि मतदार पुनरीक्षण मोहिमेला गती देणे हा या दौऱ्याचा मुख्य हेतू असल्याचे खैरे यांनी सांगितले. ‘प्रत्येक पात्र नागरिकाचे नाव मतदारयादीत असले पाहिजे. यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा,’ असे आवाहन त्यांनी केले आहे. या दौऱ्यामुळे पक्षाची संघटनात्मक बांधणी मजबूत होण्यास मदत होईल, असा विश्वास पक्षश्रेष्ठींनी व्यक्त केला आहे. --------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs IRE 1st T20I: लिंबू टिंबू समजणाऱ्या आयर्लंडने इंगा दाखवला; भारतीय गोलंदाजांना झोडले... अय्यरच्या टीमसमोर तगडे लक्ष्य ठेवले

MPSC Prelims Reform: एमपीएससी पूर्व परीक्षा वर्षातून दोन किंवा अधिक वेळा; विद्यार्थ्यांचा ताण कमी करण्यासाठी २०२७ पासून नवी पद्धत लागू

Pune University QS ranking drop: राजकीय हस्तक्षेपामुळे पुणे विद्यापीठाच्या क्यूएस मानांकनात मोठी घसरण; युवक काँग्रेसचा सरकारवर आरोप

विजय वडेट्टीवार काँग्रेस सोडणार? उदय सामंत यांच्या विधानावर नेमकं काय म्हणाले? वाचा...

Mumbai: मळमळ होते सांगून टॅक्सी थांबवली; नंतर प्रसिद्ध व्यावसायिकाने सी-लिंकवरून उडी घेतली, कारण काय?

SCROLL FOR NEXT