नाशिक

अंबड पोलिसांचे ऑल आऊट कॉम्बिंग ऑपरेशन, ९० टवाळखोरांवर कारवाई

CD
13975 नाशिक : कॉम्बिंग ऑपरेशन दरम्यान ताब्यात घेण्यात आलेले टवाळखोर. अंबडला पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन ९० टवाळखोरांवर कारवाई सकाळ वृत्तसेवा नाशिक ता.२३ : शहरातील गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्ती तसेच सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून कायदा व सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्यांविरोधात अंबड पोलिसांनी कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. कारवाईत ९० टवाळखोर संशयितांना ताब्यात घेत कारवाई केली. पोलिस उपआयुक्त किशोर काळे, सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारी आणि अंबड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जग्वेंद्रसिंग राजपूत यांच्या मार्गदर्शनाखाली मोहीम झाली. ऑपरेशनदरम्यान पवननगर, उत्तमनगर, लेखानगर, कामटवाडा आणि अंबड गाव परिसरात धडक तपासणी करण्यात आली. कारवाईत ९० टवाळखोर संशयीतांना ताब्यात घेण्यात आले. तसेच ३ नॉन-बेलेबल वॉरंट, २ बेलेबल वॉरंट आणि ६ समन्सची बजावणी करण्यात आली. पोलिसांनी हद्दीतील १० तडीपार आणि १२ रेकॉर्डवरील गुन्हेगारांची पडताळणी केली. यापैकी ६ संशयितांच्या घरांची झडती घेण्यात आली. याशिवाय २२ ठिकाणी स्टॉप अँड सर्च मोहीम राबविण्यात आली. मोहिमेत इंदिरानगर, एमआयडीसी, अंबड पोलिस ठाणे, अंबड गुन्हेशाखा तसेच गुन्हेशाखा युनिट क्रमांक २ येथील ६ अधिकारी आणि ३३ पोलिस अंमलदारांनी सहभाग घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

नव्या मतदार नोंदणीसाठी महत्त्वाची बातमी! आता नोंदणीवेळी जुळवावी लागणार २४ वर्षांपूर्वीची वंशावळ; प्रशासनाला शोध सोलापुरातील ६ लाख मतदारांचा, वाचा...

Riddhi Thakkar: ‘लेट्स एक्सप्लोर बस्तर...’ २० बाइकरचा ग्रुप, सफरीचं स्वप्न ठरलं अखेरचं, अचानक काळाचा घाला; मुंबईच्या रिद्धीचा दुर्दैवी अंत

Khutbav Accident : नियतीचा खेळ, मृत्यूतही साधला मेळ; रक्षाबंधनापूर्वी बहीण-भावावर काळाचा घाला, पारगावात हळहळ

Talegaon Dabhade News : रस्ता नसल्याने ज्येष्ठाला उपचारासाठी झोळीतून नेण्याची वेळ

मोठी बातमी! मराठा समाजातील १.८१ लाख तरुण रोजगार मागणारे नव्हे रोजगार देणारे; ७ वर्षांत अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून १८७४ कोटी

SCROLL FOR NEXT