नाशिक

Nashik Crime News: मूलबाळ होत नसल्याने विवाहितेचा छळ

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime News : लग्नात मानपान दिला नाही, तसेच मूलबाळ होत नाही म्हणून विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्या तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (torture of married woman for not having children nashik crime news)

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, फिर्यादी विवाहितेचे अंबड परिसरात माहेर असून, ती १९ जुलै २०२० ते १७ जानेवारी २०२१ या कालावधीत सासरी नांदत होती.

त्या वेळी पती प्रसाद सरोते, सासू मंगला सुभाष सरोते व भाग्यश्री जगन्नाथ कासार (सर्व रा. वडगाव शेरी, ता. जि. पुणे) यांनी संगनमत करून विवाहितेला घरकाम येत नाही, मूलबाळ होत नाही, तसेच लग्नात मानपान दिला नाही, या कारणावरून वारंवार शिवीगाळ, मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केला.

तसेच तिच्या अंगावरील दागिने बळजबरीने काढून घेतले. याप्रकरणी अंबड पोलिस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलिस नाईक शिरवले करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: उत्सवांवर निर्बंध नाहीत, पण अन्नात भेसळ नकोच! तुकाराम मुंढेंचं FDAच्या आदेशावर स्पष्टीकरण

MPSC Students Protest : पुण्यात MPSC विद्यार्थ्यांचा आक्रोश ! ओंकारेश्वर मंदिरापासून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा,राजकीय नेतेही सहभागी

Marathi News Live Updates : धनगर आरक्षणासाठी मुंबईत आंदोलन, आमदार गोपीचंद पडळकर सहभागी

'ठरलं तर मग' मालिकेतील दोन अभिनेत्यांचा मुंबई लोकलने प्रवास; आला असा अनुभव, म्हणाले- एका स्टेशनवर पोलीस...

Numerology Insights: पहिल्याच भेटीत जिंकतात सर्वांचे मन! 'या' ३ मूलांकांचे लोक मानले जातात खरे 'सोशल बटरफ्लाय'!

SCROLL FOR NEXT