Nashik Crime News : नाशिकच्या गुन्हेगारीतील क्रूरतेचे मूळ ‘एमडी’; नशेच्या तपासणीला बगल

Drugs
Drugsesakal

Nashik Crime News : सात-आठ वर्षांपूर्वी गल्लीतील ‘काका काका’ म्हणणारं तोंडभरून हाका मारणारं अल्पवयीन पोरगं थेट एखाद्या दिवशी सराईताप्रमाणे ३०-३० वार करतो कसे, हा तमाम नाशिक शहरातील नागरिकांना पडलेला प्रश्न आहे. गल्लोगल्ली अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारीत सहभाग वाढला आहे.

त्यासोबतच गुन्ह्याची क्रूरताही प्रचंड वाढली आहे. एखाद्याचा खून झाल्यानंतरही त्याच्या निपचित देहांवर सपासप वार करण्याची क्रूरता या अल्पवयीन मुलांमध्ये येण्यामागे आणि अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी टोळ्यात सहभाग वाढण्यामागे ‘एमडी’ हेच प्रमुख कारण असल्याचे सांगितले जात आहे.

मात्र संशयितांच्या वैद्यकीय चाचणीला पोलिसांकडून दिल्या जाणाऱ्या पत्रात त्यांच्या नशा आणि अमल किती, हे शोधण्यासाठी पोलिसांकडून रुग्णालयांना तशा शिफारशीच होत नाही. त्यामुळे वैद्यकीय चाचणीत ‘एमडी’चा परिणाम पुढे येत नाही. (Criminology recommendations for medical tests are flawed nashik drug crime case news)

अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारी आणि त्यातील क्रूरता वाढण्याचे कारण कुणीही शोधत नाही. त्यांचे पालकही जामीन, कोर्टकचेऱ्या, वकिलास पैशाची तरतूद या सगळ्यांच्या चक्रात गुरफटून जातात. पोलिस किंवा वैद्यकीय यंत्रणेतील अधिकाऱ्यांना नित्याचेच काम म्हणून त्याची गरजही वाटत नाही. संशयित कुठे सापडले आणि कागदावर नोंदी घेऊन पंचाची शोधाशोध करीत कधी एखाद्या वैद्यकीय तपासणीला डॉक्टरपुढे हजर करतो, एवढेच तपासी अंमलदाराला पडलेले असते.

तपास म्हणजे काय, तर फिर्यादीचा कुणावर संशय आहे. त्याचा कुणाशी वाद झाला. त्याचे कारण शोधले म्हणजे झाला तपास... किचकट गुन्हा असला, तरी आरोपी सापडलाच नाही, तर घरातील नातेवाइकांच्या उलटसुलट तपासण्या करीत, त्यात गुन्ह्याचे कारण शोधत ठराविक दिवसांत आरोपीचे नाव कागदावर घेतले म्हणजे झाला यांचा तपास... असं चित्र काही गुन्ह्यांच्या बाबतीत दिसून येते.

क्रूरता वाढीचे कारण

नाशिकला अलीकडच्या पाच-सात वर्षांत खून, खुनाचे प्रयत्नाचे गुन्हे पाहिले तर त्यात अनेकदा तीस-तीस, पस्तीस पस्तीस वार केल्याचे काही प्रकार पुढे येतील, अतिशय निर्दयपणे एखाद्याचा जीव घेणे, असेच हे गुन्ह्याचे स्वरूप दिसते. पण एवढ्या क्रूरपणे जेव्हा एखाद्यावर वार केला जातो, त्या वेळी ते संशयित कोणत्या मानसिकतेत असतात, कुठल्या अमलात किंवा नशेत असतात, याचा कधीही तपास होत नाही.

Drugs
Nashik Drug Case: MD ड्रग्जसप्रकरणी आर्थिक व्यवहारांचीही चौकशी सुरू; ‘राजकीय’ नावांमुळे प्रकरणात चर्चांना उधाण

किंबहुना वैद्यकीय चाचणीत एमडी, गांजा किंवा तत्सम अमली पदार्थांच्या नशेत आरोपी होते, असेही पुढे आणले जात नाही. तसे कागदावर घेणे म्हणजे पोलिस यंत्रणेचीच नाचक्की होण्याची भीती वाटत असावी म्हणून का होईना; पण नशेमुळे अल्पवयीन मुलांमध्ये क्रूरता वाढत असल्याचे कागदावरच घेतले जात नाही. कागदावर घेतले जात नाही. त्यामुळे त्याचा तपास होत नाही, त्यावर उपायही शोधला जात नाही, असे चित्र आहे.

‘एनसीबी’कडे तपास का नको?

नाशिकसह एमडी कारखान्याचे रॅकेट उघडकीस आल्यापासून अमुक कोटी, तमुक कोटी, मुंबई पोलिसांकडून कारवाई, नाशिक पोलिस का मागे, या आणि अशाच चर्चा सुरू आहेत. जर ३०० आणि ४०० कोटींचे नशेचे रॅकेट असेल, तर मग पोलिस यंत्रणाच यात अडकून का पडली आहे, हाही प्रश्‍न समोर येतो.

वास्तविक मुंबईत अभिनेता शाहरुख खानच्या मुलाच्या प्रकरणात जर थेट एनसीबी (नारकोर्टिस कंट्रोल बोर्ड) सारखी यंत्रणा हस्तक्षेप करते, बोटीवर छापे टाकते, राष्ट्रीय स्तरावर विषय होतो, तर मग नाशिकच्या या गुन्ह्याची तीव्रता तेवढीच असताना अजूनही ‘एनसीबी’कडे हा तपास का दिला जात नाही, हेही एक कोडेच आहे.

Drugs
Nashik Crime: अवघ्या काही तासातच खुनाच्या गुन्ह्याची उकल; पंचवटी गुन्हे शोध पथकाची कामगिरी

राजकीय रंगपंचमी

अल्पवयीन मुलांमध्ये गुन्हेगारी आणि क्रूरता वाढविणाऱ्या या विषयाचे काही प्रमाणात राजकीयकरण करून किंवा पोलिस यंत्रणेत दुही निर्माण करीत तपास भरकटविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुंबई पोलिसांनी तपास केला, की नाशिकचे पोलिस झोपेत हा विषयही तूर्तास गैरलागूच आहे.

कारवाई, तर पोलिसांनीच केली ना, कोण कमी पडले, कोण जागरूक होते, हे पोलिस विभाग पाहून घेईल ना. पण अशा रॅकेटखोरांना विविध राजकीय नेत्यांच्या दरबारी नेणारे कोण हे राजकीय झूल पांघरून राजकीय पक्षांची आणि महाराष्ट्रातील नेत्यांच्या प्रतिमेशी खेळणारे या मध्यस्थ दलालांबाबत त्या-त्या पक्षांनी आणि पोलिसांनीसुद्धा रडारवर घेतले पाहिजे.

"गुन्हेगारांच्या अटकेपूर्वी त्यांची वैद्यकीय तपासणी केली जाते. मात्र वैद्यकीय तपासणीत गुन्हेगारांच्या रक्तांच्या नमुने किंवा त्यातील अमली अंशाचे अहवाल आलेले नाहीत." - मोनिका राऊत, पोलिस उपायुक्त, नाशिक

"संशयितांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोलिस यंत्रणेकडून पत्र येत असते. त्यानुसार वैद्यकीय चाचण्या होतात. जेव्हा-जेव्हा पोलिसांकडून मागणी होते, तेव्हाच अशा स्वरूपाच्या तपासण्या होतात." - डॉ. अशोक थोरात, जिल्हा शल्यचिकित्सक, नाशिक

Drugs
Nashik Drug Case : पुणे पोलिसांनी केली ‘भूषण’सह स्पॉटव्हिजीट; पुणे, मुंबई पोलिस नाशिकमध्ये तळ ठोकून

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com