Tehsildar Nitin Kumar Deore, Mandal Adhikari Prakash Khotre, Talathi Namdev Pawar inspecting the stone crusher. esakal
नाशिक

Nashik News: मालेगावच्या तहसीलदारांकडून स्टोन क्रशरधारकांची झाडाझडती

सकाळ वृत्तसेवा

मालेगाव : तहसीलदार नितीनकुमार देवरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तालुक्यातील स्टोन क्रशरधारकांची तपासणी केली. सायने, दसाने, चिखलओहोळ, माल्हणगाव परिसरात तपासणी करून बेकायदेशीर स्टोन क्रशरवर कारवाई करण्याचा इशारा दिला.

मार्च २०२४ अखेर रॉयल्टी भरणा व आवश्यक परवानगी २१ डिसेंबरपर्यंत संबंधितांनी प्राप्त करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले. (Tree felling of stone crusher holders by tehsildars of Malegaon Nashik News)

श्री. देवरे म्हणाले, की मार्चअखेर रॉयल्टी शुल्क सरकारला भरणे, प्रदूषण मंडळाचे ना-हरकत प्रमाणपत्र, हरित लवादाची परवानगी, स्टोन क्रशर परवानगी, खाणपट्टा परवानगी व इतर आवश्यक परवानगी असल्याशिवाय सुरू असलेले स्टोन क्रशर बेकायदेशीर समजून संबंधित स्टोन क्रशर ‘सील' करण्यात येतील.

संबंधितांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येतील. अचानक झालेल्या कारवाईमुळे व तहसीलदारांनी केलेल्या झाडाझडतीमुळे स्टोन क्रशरधारकांचे धाबे दणाणले आहेत. स्टोन क्रशरधारकांनी सरकारी रॉयल्टी भरणा चुकविल्याची बाब तहसीलदारांच्या निदर्शनास आली आहे.

तालुक्यात अनेक स्टोन क्रशर बेकायदेशीर रित्या सुरू आहेत. आवश्यक परवानगी २१ डिसेंबरपर्यंत सादर न केल्यास संबंधितांवर कारवाई करण्याचा इशारा त्यांनी दिला. पथकात मंडल अधिकारी प्रकाश खोटरे, तलाठी नामदेव पवार आदींचा समावेश होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Viral Video: इंजिनिअरिंगमध्ये 3 वेळा नापास, तरुणाची पुण्यातील राजाराम पुलावरून नदीपात्रात उडी, व्हिडिओ व्हायरल

Mumbai Nashik Highway: मुंबई-नाशिक महामार्गाची दुरावस्था, शरद पवार गटाचा संताप; उच्च न्यायालयात धाव

ENG vs IND: शुभमन गिलच्या टीम इंडियाने इतिहास रचला, ५८ वर्षांत पहिल्यांदाच बर्मिंगहॅममध्ये फडकवली विजयी पताका

Latest Maharashtra News Updates: दिवसभरातील ताज्या बातम्या वाचा एका क्लिकवर

Mumbai University: मुंबई विद्यापीठात इतर भाषिकांना मिळणार मराठीचे ऑनलाइन धडे

SCROLL FOR NEXT