Heavy Rain in Trambakeshwar esakal
नाशिक

Nashik Rain Update : त्र्यंबकेश्‍वरमध्ये कोसळला 119 mm पाऊस; भाताचे मोठे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सुरगाण्यात ढगफुटीसदृश परिस्थिती तयार झाल्याच्या दुसऱ्या दिवशीही संततधार सुरू होती. त्र्यंबकेश्‍वरमध्ये मंगळवारी (ता. १८) सायंकाळपासून बुधवारी (ता. १९) सकाळपर्यंत ११९ मिलिमीटर पाऊस कोसळला. त्यामुळे भाताचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. तसेच सिन्नर तालुक्यात धो-धो कोसळलेल्या पावसामुळे आजही भोजापूर धरणातून एक हजार ५२४ क्यूसेक विसर्ग सुरू होता. (Trimbakeshwar received 119 mm of rain Great loss of rice Nashik Rain Update News)

दारणा धरणातून ८५०, कडवामधून २१२, वालदेवीमधून ६५, आळंदीमधून ३०, नांदूरमध्यमेश्‍वरमधून आठ हजार ९३८, तर पालखेडमधून एक हजार ३११ क्यूसेक विसर्ग सुरू आहे. नाशिकमध्ये बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत ३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. तसेच सकाळी साडेआठ ते रात्री साडेआठ या बारा तासांत १७.९ मिलिमीटर पाऊस झाला.

बुधवारी सकाळी संपलेल्या चोवीस तासांत काही मंडलांत झालेला पाऊस मिलिमीटरमध्ये असा : सौंदाणे- ३९.८, सटाणा- १६.५, मुल्हेर- १४.५, कळवण- २०.८, कनाशी- २०.८, दळवट- २०.८, अभोणा- २०.८, उंबरठाण- २०.३, सुरगाणा-२०.३, माडसांगवी- २६.३, मखमलाबाद- १९, दिंडोरी- १५, मोहाडी- १४.३, उमराळे- २२.५, वरखेडा- २५, वाडीवऱ्हे- ४७.३, नांदगाव सदो- २०.३, धारगाव- १४.५, जोगमोडी- २८.३, कोहोर- २२.५, चांदोरी- ४०.८, सायखेडा- १५.८, देवळा- १३.३.

आदिवासी शेतकरी धास्तावले

त्र्यंबकेश्‍वर : निसवलेल्या हळव्या भाताचे परतीच्या पावसाने नुकसान होत आहे. गऱ्या भाताची हीच स्थिती आहे. त्यामुळे आदिवासी शेतकरी धास्तावले आहेत. शेतीसाठी कर्ज काढून केलेल्या मेहनतीवर निसर्गराजा पाणी फिरवत आहे. रोज सकाळी ऊन, तर दुपारपासून रात्रभर पाऊस असे हवामान आहे.

त्यामुळे शहरातील व्यापारी आणि छोट्या व्यावसायिकांपुढे उलाढालीचे प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे. कोरोनानंतरच्या दोन वर्षांनंतरच्या दिवाळीचा आनंद कसा लुटायचा, असा शहरवासीयांप्रमाणे तालुक्यातून प्रश्‍न निर्माण होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate: १९९६ चा खटला… दिवंगत बापासाठी मुलगी लढली अन् न्याय मिळून दिला, माणिकराव कोकाटेंविरोधात लढलेल्या ॲड. अंजली दिघोळे...

ICC T20I Rankings: वरूण चक्रवर्थीने मोडला पाकिस्तानी गोलंदाजाचा विक्रम; आता टार्गेटवर शाहिद आफ्रिदी...

Breaking News Manikrao Kokate : माणिकराव कोकाटे यांच्यावर अटक वॉरंट जारी, त्वरीत अटक करण्याचे आदेश

Leopard Attack : बिबट्यापुढे धाडसी मातेचे शौर्य ठरले व्यर्थ; डोळ्यांदेखत पोटच्या गोळ्याला नेले फरपटत; हंबरड्याने पाणावले उपस्थितांचे डोळे

NASA Scientist Salary: NASA मध्ये संशोधन शास्त्रज्ञाला किती पगार मिळतो; जाणून घ्या सुविधा काय आहेत?

SCROLL FOR NEXT