Rotten onion in chali
Rotten onion in chali esakal
नाशिक

Nashik Crime: कळवण येथील शेतकऱ्याच्या कांदा चाळीत अज्ञाताने टाकला युरिया; अडीच हजार क्विंटल कांद्याचे नुकसान

सकाळ वृत्तसेवा

Nashik Crime : तालुक्यातील रवळजी येथील नर्मदाबाई दौलत शिंदे यांच्या गट नंबर १२९ मधील कांदा चाळीत अज्ञात इसमाने युरिया टाकल्याने अडीच हजार क्विंटल कांदा सडला आहे. यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे.

कृषी व महसूल विभागाने तात्काळ पंचनामा करावा व पोलीस विभागाने नुकसान करणाऱ्याला पकडून कठोर शासन करावे अशी मागणी नुकसंग्रस्थ शेतकरी नर्मदाबाई शिंदे यांनी केली आहे. (unknown person put urea in onion chali of farmer in Kalwan Loss of two half thousand quintals of onion Nashik Crime news)

रवळजी ता. कळवण येथील शेतकरी नर्मदाबाई दौलत शिंदे यांची रवळजी ते देसाराणे शिवारात गट नंबर १२९ ही शेतजमीन आहे. त्यांचे वास्तव्य शेतशिवारातच आहे. त्यांच्या घराशेजारी दोन कांदा चाळी आहेत. पैकी शंभर शंभर फुटाचे दोन कप्पे असलेल्या दोनशे फुटाच्या चाळीत जवळपास अडीच हजार क्विंटल गावठी कांदा साठवलेला आहे.

या कांद्याचा वास येऊ लागल्याने त्यांनी कांदा चाळ फोडून पहिली असता आतील संपूर्ण कांदा सडला आहे. या कांद्यात युरियाचे गोळे आढळून आले आहेत. अज्ञात व्यक्तीने हा युरिया टाकल्याचा त्यांना संशय आहे.

यात त्यांचे लाखोंचे नुकसान झाले आहे. उत्पादन खर्च व वार्षिक पीक वाया गळे आहे. आधीच अस्मानी सुलतानी संकटांवर मात करीत त्यांनी मोठ्या कष्टाने त्यांनी गावठी कांदा पिकविला होता. सध्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत असल्याने कांदा चाळीत साठवला होता.

मात्र समाज कंठकाणे चाळीत युरिया टाकून त्यांच्या मेहनतीवर पाणी फिरविले आहे. कांदा लागवडीसाठी बँक ऑफ महाराष्ट्रचे दोन लाखांचे पीक कर्ज व नातलगांकडून हात उसनवारीने पैसे घेतले होते.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

हातातोंडाशी आलेले घास हिरावला गेल्याने त्यांचेवर या घटनेमुळे कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. अवकाळी व गारपिटिले हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने फुकाचे आश्वासन देऊन तोंडाला पाने पुसण्याचे काम केले असताना या स्थानिक संकटानेही शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे.

झालेल्या नुकसानचे कृषी व महसूल विभागाने तात्काळ पंचनामे करावेत व पोलिसांनी या समाज कंठकांचा बंदोबस्त करून शेतकऱ्याना दिलासा द्यावा अशी मागणी शेतकरी नर्मदाबाई शिंदे यांनी केले आहे.

"लाखो रुपये खर्च करून कांदा पीक काढले होते. कांदा घरा शेजारील दोन चाळीत साठवला होता घराच्या शेजारील बाजूने चाळ असल्याने व घराशेजारी कोणी बघेल म्हणून या चाळीत अज्ञाताला युरिया टाकता आला नाही म्हणून ती चाळ वाचली परंतु त्या चाळी पलीकडील चाळीत युरिया टाकल्याने २५० क्विंटल कांद्याचे नुकसान झाले आहे. कांदा पूर्णतः सडला आहे."

- नर्मदाबाई शिंदे - शेतकरी -रवळजी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कर्तव्यनिष्ठ CJI चंद्रचूड! ब्राझीलरुन परतताना विमानात तयार केला निर्णयाचा मसुदा, असा केला इंटरनेटचा जुगाड

Uddhav Thackeray : महाराष्ट्र तुम्हाला मातीत गाडेल;उद्धव ठाकरे यांचा मोदी-शहा यांना ‘इंडिया’च्या सभेत इशारा

One Chip Challenge: अति मसालेदार चिप्स खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका; तरुणाने गमावला जीव

Hardik Pandya Banned : T20 वर्ल्ड कपपूर्वी BCCIने हार्दिक पांड्यावर घातली बंदी! 'या' चुकीची मोजावी लागली किंमत

Loksabha News: मोदींनी घेतली नाही ठाकरेंच्या मागण्यांची दखल, नागरिकांमध्ये रंगल्या चर्चा

SCROLL FOR NEXT