Sangli Crime : 'दिदीचं लग्न आहे, अडीच लाख परत दे'; मानसिक तणावातून तरुणाची आत्महत्या

त्याच्या बहिणीचे लग्न असल्याने त्याने तिघांकडे दिलेले पैसे परत मागितले.
Sangli Crime News
Sangli Crime News esakal
Updated on: 
Summary

अक्षयचे वडिल जालिंदर यशवंत माळी यांनी तिघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

सांगली : उसने दिलेले अडीच लाख रुपये बहिणीच्या लग्नासाठी (Marriage) पाहिजेत, म्हणून सतत मागणी करूनही परत देण्यास टाळाटाळ केल्याने युवकाने मानसिक तणावाखाली आत्महत्या केल्याची तक्रार सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात (Sangli Rural Police Station) दाखल झाली आहे.

ही घटना २९ एप्रिल रोजी कवलापूर येथे घडली. अक्षय जालिंदर माळी (वय २६, दत्ता मळा, कवलापूर) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. अक्षयचे वडिल जालिंदर यशवंत माळी यांनी तिघांविरोधात सांगली ग्रामीण पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.

Sangli Crime News
Sambhajinagar : लग्नास विरोध झाल्यामुळं दोघं पळून गेले अन् आळंदीत लग्न केलं; पण पोलिसांनी 'त्यांना' पकडलंच!

त्यानुसार पोलिसांनी विष्णू माळी, आतिश विष्णू माळी आणि तुकाराम तोडेर (दत्त मळा, कवलापूर) यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मृत अक्षय माळी याने या तिघांना मिळून दोन लाख ५३ हजार ५०० रुपये उसने दिले होते. त्याच्या बहिणीचे लग्न असल्याने त्याने तिघांकडे दिलेले पैसे परत मागितले.

Sangli Crime News
Sanjay Raut : 'मोदी, शहांच्या शंभर पिढ्या आल्या तरी बाळासाहेबांची शिवसेना कधीच संपणार नाही'

परंतु त्यांनी पैसे परत देण्यास टाळाटाळ केली. यामुळे अक्षय मानसिक तणावाखाली होता. त्यातूनच त्याने गेल्या महिन्यात २९ एप्रिल रोजी सायंकाळी राहत्या घरात आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli ST 1519 special bus trips Ganesh festival
Islampur Police Arrest Two Suspects in Alleged Assault Case
Woman Allegedly Extorted of ₹17 Lakh
Sangli police superintendent Tushar Doshi
Marathi News Esakal
www.esakal.com