Valentines Day
Valentines Day esakal
नाशिक

Valentines Day Special : प्रेमाचा नेमका रंग ओळखा....

सकाळ वृत्तसेवा

लेखक : डॉ. विशाल जाधव

जगभर व्हॅलेंटाइन डे अत्यंत उत्साहात साजरा होतो. गेल्या काही वर्षात तरुणाईसाठी तर हा उत्सव बनला आहे.

मात्र, या दिवसाकडे निकोप दृष्टिने पाहायला हवे. नेमके जे करायला हवे, तेच अशा दिवसांमध्ये दिसत नाही. हे चित्र बदलण्यासाठी आशा व्यक्त करणारा हा विशेष लेख...(Valentine Day Special latest marathi article by dr vishal jadhav on Know exact color of love nashik news)

आज जगभरात प्रेमाचा उत्सव साजरा होत आहे. तरुण वयात असताना शारीरिक बदलांमुळे तरुण-तरुणी भान हरपून प्रेमाच्या दुनियेत जगत असतात. या प्रकारे जगत असताना ते भूतकाळाचा विचार करतात ना भविष्याचा.

‘आजचा दिवस जगा उद्याचे उद्या बघू’ अशी मानसिकता वाढत चालली आहे. किमान अशा काही आयुष्य बदलणाऱ्या प्रसंगांमध्ये भविष्याचा विचार अत्यंत महत्त्वाचा ठरतो. आपण मागच्या पिढीचा विचार केला तर आपल्या लक्षात येईल की, त्यांची प्रेमाची व्याख्या ही सर्वसमावेशक होती. मागच्या पिढीतील तरुण-तरुणी या विषयांत प्रामाणिक व मानसिकदृष्ट्या खंबीर होत्या.

विपरीत परिस्थितीमध्ये सुद्धा कौटुंबिक, सामाजिक व व्यावहारिक भान ठेवून प्रेम सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांनी पुढे नेले. त्यामुळे त्या काळात मोठे विचारवंत, उद्योजक तयार झाले. अशा प्रकारे प्रेमाचा ‘पॉझिटिव्ह इम्पॅक्ट’ सुद्धा बघायला मिळतो.

मागच्या पिढीतील तरुणी या संयमी व खंबीर होत्या. तरुणांकडून त्यांना प्रेमाशिवाय बाकीच्या भौतिक गोष्टींचा मोह नव्हता. आता प्रियकराने वेळ दिला आणि कामाच्या अतिताणामुळे वेळ पाळता आला नाही तर तांडव करणाऱ्या मुली सर्रास बघायला मिळतात.

प्रेमाची भावना ही साधारणपणे चौदा वर्षांनंतर मुला-मुलींमध्ये वाढायला लागते. खरेतर यामागे शास्त्रीय कारणे आहेत. या वयात शरीरातील वेगवेगळी हार्मोन्स जसे सेरोटोनिन, एड्रेनालाईन व गोनाडोट्रॉपिक हार्मोन्स अधिक प्रमाणात तयार होतात.

नेमके याच वयात भविष्याचा वेधसुद्धा घेणे गरजेचे असते. या वयात योग्य व्यक्ती बरोबर प्रेम झाले अथवा जोडीदार योग्य पद्धतीने वागला तर अशा जोडप्यांचा सर्वांगीण विकास झालेली उदाहरणे समाजासमोर आहेत. परंतु प्रेम ज्यांनी सर्वस्व समजले त्यांची अधोगती झालेली दिसते.

अशा परिस्थितीत माझ्या मते मुलींची भूमिका निर्णायक असते. आत्ताच्या काळात मुलेही जास्त भावनिक आहेत. मुली अति प्रॅक्टिकल झालेल्या दिसतात. मुलांवर खासगीकरण, उदारीकरण व बाजारीकरण या धोरणांचा विपरीत परिणाम दिसून येतो.

नोकरी व उद्योगास स्थिरता नसल्यामुळे मानसिक ताणतणाव निश्चितपणाने वाढलेला आहे. अशा अवस्थेत तरुणाला फक्त तू लढ म्हणा ही अपेक्षा आपल्या प्रेयसीकडून असते. तिने जर अशा परिस्थितीत त्याला सांभाळले तर प्रेमाचा रंग बहरत जातो व तो नवीन कितीही मोठे आव्हान असेल तर त्यास सामोरे जाण्याची सकारात्मक ऊर्जा त्यात निर्माण होते.

हीच स्थिती अनेकदा मुलींच्या संदर्भातही लागू आहे. म्हणजे कोणत्याही परिस्थितीत खंबीर साथ देणाऱ्या मुलांची त्यांना गरज असते. ही ऊर्जा प्रत्येकाला हवी असते. यासाठी तो व ती कुठल्या ना कुठल्या नात्यांत शोध घेत असतो.

मात्र, अशा परिस्थितीत तरुणाला जरी आई, वडील मित्रमंडळींचा भावनिक आधार मिळाला तरी सुद्धा त्याचा प्रभाव हा नक्कीच प्रेयसीच्या भावनिक आधारा पुढे फिका पडतो. तरुणांवर किती नाही म्हटले तरी आर्थिक, सामाजिक जबाबदारी जास्त प्रमाणात असते.

त्यामुळे तरुण मंडळी चंगळवादापासून थोडे अलिप्त राहण्याचा प्रयत्न करतात. तरुणींकडून मात्र शक्य नसले तरी हॉटेलिंग, आऊटिंग, ब्रँडेड कपडे, मोबाईल या मुद्द्यांना प्रतिष्ठेसाठी प्राधान्य दिले जाते. त्यामुळे इच्छा पूर्ण न झाल्यास त्याचे तिरस्कारात रूपांतर होते.

अशा तरुणींनी खंबीर राहून व आव्हानात्मक काळात तरुणाला साथ दिली तर हे प्रेम वाढतच जाते, हे प्रेम वाढतच जावे, ही सामाजिक स्वास्थासाठी गरजेचे आहे. दोघांनीही एकमेकांना संघर्षमय अथवा कठीण काळात साथ देणे गरजेचे आहे. कारण प्रेम भंग अथवा ब्रेकअप म्हणजे दोन दोघांचीही मानसिकदृष्ट्या खच्चीकरण होय.

यामध्ये काही तरुण टोकाची भूमिका घेऊन जीवन संपवतात. त्यामुळे प्रेमभंग अथवा ब्रेकअप झालेले जोडपे एका कवीच्या पंक्ती विसरतात. "प्रेम कर भिल्लासारखं पानावरती खोचलेलं मातीमध्ये उगवून सुद्धा मेघापर्यंत पोहोचलेले". बुद्धांनी सुद्धा प्रेमाबद्दल अतिशय योग्य पद्धतीने सांगितलेला आहे.

"प्रियाचा वियोग दुःख अप्रियाचा संयोग दुःख" अशी बुद्धांनी प्रेमाची व्याख्या केलेली आहे. त्यामुळे आजच्या तरुण-तरुणींनी प्रेम करणे ही भक्ती आहे, हे समजावे. भक्ती करताना तो फक्त देवाकडून काहीही अपेक्षा ठेवत नाही. फक्त निर्मळ भक्ती करत असतो.

अशा व्यक्तीमुळे नक्कीच आपणास आपल्या आयुष्यात उशिरा का होईना यश मिळत असते, हे लक्षात ठेवणे अतिशय गरजेचे आहे. प्रेमाच्या या सागरात सर्वांनी अवश्य पाहावे.

परंतु एक सुद्धा तरुण-तरुणींनी या सागरात डुबून जाऊ नये. उलट आपण यशस्वीरित्याबाहेर येऊन चुकत असलेल्या जोडप्यांना मानसिक आधार देऊन या प्रेमाचा आनंद घ्यावा, आपण त्यांना सांगावे-जीवन गाणे गातच राहावे झाले.

गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे. सामाजिक व मानसिक स्वास्थ्यासाठी व देशाच्या समाजाच्या व जगाच्या हितासाठी एकमेकांमध्ये प्रेम वाढत जाणे, हे अतिशय गरजेचे आहे. यातच त्या दोन तरुण-तरुणींचे हित व देशाचे समाजाचे हित आहे, हे लक्षात ठेवावे.

(लेखक दंततज्ज्ञ असून शासकीय सेवेत कार्यरत आहेत.)

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Live Update: शिवानी अग्रवालला उद्या कोर्टात हजर केले जाणार

IND vs PAK: 'पाकिस्तानला सुरुवातीचे पंच तोच मारेल...', भारताविरुद्ध सामन्यापूर्वी माजी कर्णधाराचा आपल्याच संघाला इशारा

100 वर्ष जुनं पुस्तक खरेदी करण्यासाठी उद्योगपती गेला खाजगी विमानाने; कोणतं आहे ते पुस्तक?

Chhaya Kadam : रेड कार्पेटवर 'ते' मराठी गाणं वाजलं अन् मी डान्स करायला सुरुवात केली; छाया कदम यांनी सांगितले 'कान'चे खास किस्से

Amravati Loksabha Election : अमरावतीत मतविभाजनाचा लाभ कुणाला?

SCROLL FOR NEXT