Valentines Day 2024 : घरच्या घरी रेड वेलवेट केक बनवून पार्टनरला द्या गोड सरप्राईज, वाचा ‘ही’ सोपी रेसिपी

जगभरात आज ‘व्हॅलेंटाईन्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारीला हा प्रेमाचा दिवस साजरा केला जातो.
Valentines Day 2024
Valentines Day 2024esakal

Valentines Day 2024 : जगभरात आज ‘व्हॅलेंटाईन्स डे’ मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. दरवर्षी १४ फेब्रुवारीला हा प्रेमाचा दिवस साजरा केला जातो. हा दिवस स्पेशल पद्धतीने साजरा करण्यासाठी कपल्स विविध प्रकारचे प्लॅन्स बनवतात. आजचा हा दिवस खास बनवण्यासाठी अनेक कपल्स फिरायला जाण्याचे किंवा मस्त डिनर डेटला जाण्याचे प्लॅनिंग करतात.

या उलट काही कपल्स घरच्या घरीच हा दिवस साजरा करतात. घरच्या घरी हा दिवस साजरा करण्यासाठी मग छानपैकी जेवण बनवण्याचे काही जण नियोजन करतात तर काही जण बाहेरून काही खाद्यपदार्थ ऑर्डर करतात.

या ‘व्हॅलेंटाईन डे’ ला तुम्ही तुमच्या जोडीदारासाठी घरीच डिनर डेटचे प्लॅनिंग केले असेल, तर खास तुमच्यासाठी आज आम्ही एक रेसिपी घेऊन आलो आहोत. ही रेसिपी आहे रेड वेलवेट केकची. हा स्पेशल केक बनवून तुम्ही जोडीदाराचे मन नक्कीच जिंकू शकता. चला तर मग जाणून घेऊयात ही रेसिपी.

Valentines Day 2024
Unique Birthday Traditions : या देशांमध्ये केकशिवाय वाढदिवस साजरा केला जातो, बनवले जातात हे पदार्थ

रेड वेलवेट केक बनवण्यासाठी लागणारे साहित्य खालीलप्रमाणे :

  • १ कप दूध

  • मैदा – दीड कप

  • कंडेन्स्ड मिल्क – ३ कप

  • व्हिनेगर – दीड चमचा

  • तेल

  • व्हॅनिला इसेन्स – दीड चमचा

  • रेड फूड कलर – २ चमचे

  • साखर – अर्धी वाटी

  • बेकिंग सोडा

  • बेकिंग पावडर

  • हेव्ही क्रीम आवश्यकतेनुसार

  • पीठीसाखर – गरजेनुसार

रेड वेलवेट केक बनवण्याची योग्य पद्धत खालीलप्रमाणे :

  • रेड वेलवेट केक बनवण्यासाठी सर्वात आधी तुमचा ओव्हन १७५ डिग्री सेल्सिअसवर गरम करायला ठेवा. त्यानंतर एका मोठ्या बाऊलमध्ये कंडेन्स्ड मिल्क आणि तेल एकत्र करून चांगले फेटून घ्या.

  • या मिश्रणाला क्रिमी टेक्सचर मिळाल्यानंतर त्यात आता मैदा, बेकिंग पावडर, व्हॅनिला इसेन्स आणि बेकिंग सोडा घालून चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्या.

  • आता या मिश्रणात दूध मिसळा आणि ते चांगले फेटून घ्या. या मिश्रणात गुठळ्या राहता कामा नयेत, याची काळजी घ्या.

  • आता हे केकचे मिश्रण चांगल्या प्रकारे तयार झाल्यानंतर त्यात लाल रंगाचा फूड कलर आणि थोडे व्हिनेगर मिसळा.

  • त्यानंतर, केकच्या भांड्याला बटर किंवा तूप लावून घ्या. आता या भांड्यात केकचे मिश्रण घाला. आता हे केकचे मिश्रण ओव्हनमध्ये २० ते २५ मिनिटांसाठी बेक करायला ठेवा. केक चांगल्या प्रकारे शिजल्यानंतर केक बाहेर काढून थंड करायला ठेवा.

  • केक चांगला थंड झाल्यानंतर त्यावर आयसिंग करायला विसरू नका. तुम्ही तुमच्या आवडीनुसार आयसिंग करून केक चांगल्या प्रकारे सजवू शकता.

Valentines Day 2024
Healthy Breakfast Recipe : सकाळच्या नाश्त्यामध्ये बनवा हिरव्या हरभऱ्याचे स्पेशल चाट, एकदम सोपी आहे रेसिपी

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com