kalvan farming
kalvan farming esakal
नाशिक

कल्पकता अन् अथक परिश्रमातून ‘ती’ने फुलविली शेती!

रवींद्र पगार

कळवण (जि.नाशिक) : सुयोग्य नियोजन, अथक परिश्रम आणि अभ्यासपूर्ण प्रयत्नांना मेहनतीची जोड देत ३० एकर क्षेत्रात विविध प्रकारची फळझाडे आणि पिकांचे उत्पादन यशस्वीरीत्या घेत मानूर (ता. कळवण) येथील श्रीलेखा पाटील यांनी कल्पकतेतून शेती फुलविली आहे. पारंपरिक शेतीसोबतच शेतात वेगळे प्रयोग राबवत शेतकऱ्यांपुढे आदर्श उदाहरण निर्माण केले आहे. (variety-of-fruit-trees-in-an-area-of-​​30-acres-nashik-marathi-news)

तीस एकर क्षेत्रात केशर आंबा, खपली गव्हासह विविध पिकांचे उत्पादन

मानूर येथील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कन्या असलेल्या श्रीलेखा पाटील यांनी मानूर शिवारातील शेतीत उत्कृष्ट नियोजन करत वेगवेगळी पिके घेतली आहेत. एक महिला आपल्या अचाट बुद्धिमत्ता आणि कर्तृत्वाच्या बळावर उत्तम प्रकारे नियोजन करून शेती विकसित करू शकते, याचे उदाहरण पाटील यांनी दाखवून दिले आहे. पाटील यांनी दोन एकर क्षेत्रात केशर आंब्याची रोपे लावली असून, चांगल्या प्रकारे नियोजन केल्याने आंबा मोठ्या प्रमाणात बहरला आहे. पाटील यांनी खपली गव्हाचा प्रयोगही शेतात केला आहे. या गव्हाचे उत्पादन पश्चिम महाराष्ट्रात विशेषतः सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली या भागात घेतले जाते.

खपली गव्हाचे वैशिष्ट्य म्हणजे तो काढणीनंतरही टणक अशा टरफलात असतो. बियाणे म्हणूनही तो टरफलासहित वापरला जातो. जेव्हा खपली गव्हाचा खाण्यासाठी उपयोग करायचा असेल तेव्हा तो गिरणीत नेऊन भरडावा लागतो. यातील गहू तांबड्या रंगाचा व लांबसडक असतो. एक क्विंटल खपलीपासून ७० किलो गहू निघतो. पाटील यांनी खपली गव्हाचे यशस्वीरीत्या उत्पादन केले आहे. काही क्षेत्रात आद्रक लागवड करण्यात आली आहे. केळी लागवडीचाही प्रयोग पाटील यांनी केला असून, तो यशस्वी झाला आहे. माळारानावर विविध पिकांबरोबरच आपल्या अमृत फार्ममध्ये दर्शनी भागात शंकर भगवान मांदिर, लाकडी घर, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत.

दोन हजाराहून अधिक झाडे

श्रीलेखा पाटील यांनी आपल्या शेतीच्या बांधावर, कडेला सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या दोन हजारांहून अधिक झाडांची लागवड केली असून, हिरव्यागार झाडीने हा संपूर्ण परिसर निसर्गरम्य झाला आहे.

सामाजिक क्षेत्रातही कर्तृत्वाचा ठसा

श्रीलेखा पाटील यांचा कृषी क्षेत्रात नेहमीच नवनवे प्रयोग करण्याचा प्रयत्न राहिला असून, सामाजिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटविला आहे. स्वर्गीय डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या कन्या असलेल्या पाटील सोलापूर जिल्ह्यातील श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांच्या पत्नी आहेत. श्रीलेखा पाटील संस्थेच्या सचिव असून, माळशिरस तालुक्यातील पाणिवच्या सरपंच आहेत.

वडील डॉ. आप्पासाहेब पवार यांच्या प्रेरणेतून आम्ही शेतीत वेगवेगळे प्रयोग राबविले असून, केशर आंबा, पेरू, केळी अशा फळांसोबतच खपली गहू, आद्रक या पिकांचे उत्पादन घेतले आहे. शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीसोबतच नावीन्यता जोपासल्यास त्याचा निश्चित फायदा होईल. -श्रीलेखा पाटील, मानूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CAA Beneficiary: आधी सीएएची प्रमाणपत्रं वाटली आता तेच लाभार्थी थेट मोदींसोबत स्टेजवर!

IPL 2024 RCB vs CSK Live Score: आनंदाची बातमी! पावसाच्या व्यत्ययानंतर बेंगळुरू-चेन्नई सामन्याला पुन्हा सुरुवात

MI vs LSG: मुंबईच्या पराभवानंतर रोहितबरोबर नीता अंबानींची आधी गहन चर्चा अन् मग ड्रेसिंग रुममध्ये दिलं स्पेशल मेडल, Video व्हायरल

मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान करा, सहा महिन्यात POK भारताचा भाग होईल; योगींची मोठी घोषणा

Latest Marathi News Live Update : हे मोदींचे युग आहे, आम्ही घरी घुसून मारतो- पंतप्रधान मोदी

SCROLL FOR NEXT