nashik Ward 16
nashik Ward 16  sakal
नाशिक

नाशिक : सुशिक्षातांच्या प्रभागात पक्ष नव्हे, व्यक्ती महत्त्वाचा

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : सातपूरच्या स्वारबाबानगर ते भोसला मिलिटरी स्कूलजवळील कामगारनगर, पुन्हा मायको सर्कल ते शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन असा अक्राळविक्राळ पसरलेल्या या प्रभागात बँका, खासगी कार्यालयांमध्ये बौद्धिक काम करणारा वर्ग आहे. तसाच कारखान्यांमध्ये काम करणारा कामगारदेखील आहे. मोलमजुरी करून दररोज पोट भरणारा झोपडपट्टीतील मजुर वर्गदेखील याच प्रभागात सापडतो. त्यामुळे हिंदी गाण्यातील रिमिक्स प्रमाणे झालेल्या प्रभागात कोण बाजी मारणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

भाजपचा चाहता वर्ग येथे आहे. त्यामुळे संपूर्ण पॅनलच निवडून येईल, असा होरा आहे. परंतु, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसने बसविलेला जम दुर्लक्षून चालणार नाही. सुशिक्षतांचा प्रभाग असला तरी जात हा घटकदेखील महत्त्वाचा ठरतो म्हणून अमुक-तमुक जातीचे गणिते मांडून निवडणुकीच्या रिंगणात अनेक जण उतरले आहे. परंतु, या भागात पक्षाचे चिन्ह पाहून नव्हे तर व्यक्तीचा चेहरा पाहून मतदार निर्णय घेतात. असा आजपर्यंतचा इतिहास आहे. बंगलो ते फ्लॅट व कामगार वस्ती ते झोपडपट्टी अशा मिश्रित स्वरूपाच्या या प्रभागात पॅनल तयार करताना मोठी कसरत करावी लागत आहे. प्रत्येक भागाला प्रतिनिधित्व देण्यासाठी उमेदवारांचा शोध घेतला जात असला तरी तेवढ्या ताकदीचा उमेदवार मिळत नाही. काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक पॅनल, तर भाजपचा पॅनल अशीच सरळ लढत होण्याचीच दाट शक्यता आहे.

प्रभागाची व्याप्ती

महात्मानगर, कामगारनगर, पीटीसी, पारिजातनगर, कृषीनगर, एचपीटी कॉलेज, रामदास कॉलनी, शरणपूर गावठाण, कुलकर्णी गार्डन, उत्कर्षनगर, सिद्धार्थनगर, पी ॲन्ड टी कॉलनी, लव्हाटेनगर.

उत्तर ः एमआयडीसी, आनंदवली रस्त्यावरील टीडीके इंडिया कंपनी, कामगारनगर, ऋषभ इन्स्ट्रुमेंट कंपनी, वनविहार कॉलनी, ऋषभ होंडा शोरूमपर्यंत. पूर्वेकडील कॅनॉलपर्यंत. सायकल ट्रॅकने पाटबंधारे विभाग कार्यालयापर्यंत. कॉलेज रोडवरील मॉडेल चौक, कॅनडा कॉर्नर चौक, शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डन.

पूर्व ः शरणपूर रोडवरील कुलकर्णी गार्डनपासून साधू वासवानी रस्त्याने मायको सर्कलपर्यंत.

दक्षिण ः मायको सर्कलपासून उंटवाडी रस्त्याने नंदिनी नदीवरील उंटवाडी पुलापर्यंत. लव्हाटेनगर, विकास कॉलनी, खुटवडनगर जवळच्या पुलापर्यंत. मुथा हॉस्पिटलपासून आयटीआयपर्यंत. स्वारबाबानगरकडील फोरसम कंपनी, हॉटेल जिंजरपर्यंत. उत्तरेकडील भागाने त्र्यंबक रोडवरील सकाळ सर्कल.

पश्चिम ः सकाळ सर्कलपासून पूर्वेकडील भागाने अभय प्रॉडक्ट्स कंपनी समोरील एचके इंडस्ट्रीजपर्यंत. रेनॉल्ट सर्विस, कामगारनगर रस्त्यावरील टीडीके इंडिया कंपनीपर्यंत.

हे आहेत इच्छुक

रंजन ठाकरे, सुरेश पाटील, शिवाजी गांगुर्डे, समीर कांबळे, योगिता आहेर, वसंत ठाकरे, रवींद्र गांगुर्डे, धनंजय बेळे, प्रेरणा बेळे, माधवी पाटील, धनंजय निकाळे, मनिषा पाटील, किशोर वडजे, स्वाती बिडला, कुणाल भोसले, चित्रेश वस्पटे, केतकी वस्पटे-देशपांडे, रमेश धात्रक, प्रशांत दैतकर, वर्षा येवले, मिलिंद खाडे, अविनाश पाटील, प्रभा काठे, संजय कातकाडे, विलास देसले, अंकिता वावरे, शिवानी देसले, पूजा वाखारकर, संदीप काळे, विनोद येवलेकर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

राहुल गांधी रायबरेलीतून लोकसभेच्या रिंगणात, अमेठीचा उमेदवारही ठरला; अखेर शिक्कामोर्तब

Morning Breakfast: सकाळच्या नाश्त्यात झटपट बनवा पनीर रोस्टी, नोट करा रेसिपी

World Press Freedom Day 2024 : जागतिक पत्रकारिता स्वातंत्र्य दिन का साजरा केला जातो? जाणून घ्या इतिहास

Sakal Podcast : जळगावात कोणाचं पारडं जड? ते इन्स्टाग्रामच्या नियमांमध्ये मोठा बदल

Latest Marathi News Live Update : भाजप उमेदवारांच्या प्रचारासाठी अमित शहा आज कर्नाटक दौऱ्यावर

SCROLL FOR NEXT