leopard attack esakal
नाशिक

Nashik Leopard Attack : बिबट्याच्या हल्यात तरुण ठार; वडबारी शिवारातील घटना

सकाळ वृत्तसेवा

Nashik Leopard Attack : तालुक्यातील हरणगाव पैकी वडबारी येथील शिवारात जनावरे चारण्यासाठी गेलेल्या तरुणावर शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने हल्ला करून जागीच ठार केले.

रवींद्र वामन गावित (वय ३३, रा. हरणगाव) रविवारी (ता. २७) पहाटे साडेपाचच्या सुमारास स्वत:ची जनावरे चारण्यासाठी वडबारीच्या रानात गेला होता. सकाळी नऊ ते दहाच्या दरम्यान रवींद्र चहा-नास्त्यासाठी घरी न आल्याने घरच्या लोकांनी त्याच्या मोबाईलवर संपर्क केला असता, प्रतिसाद मिळाला नाही. (Youth killed in leopard attack nashik news)

यामुळे नातेवाइकांसह ग्रामस्थांनी जंगलात शोधशोध केली असता, ऊसाच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने रवींद्रवर हल्ला केलेला छिन्नविछीन्न मृतदेह वडबारीच्या फरशी नाल्याजवळ गोवर्धन जाधव यांच्या शेताजवळ आढळून आला. बिबट्याने रवींद्रची मांडी, खांदा व गळा फाडल्याचे निर्दशनास आले.

मृतदेह विच्छेदनासाठी पेठ ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आला. पोलिस पंचनाम्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेमुळे हरणगाव वडबारी, आसरबारी, नडगदरी परिसरात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने पिंजरा लावावा, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

"हरणगावच्या तरुणाला हल्ला करून बिबट्याने जागीच ठार केले, ही घटना अत्यंत दुर्दैवी आहे. जंगलात बिबट्या बछडासह फिरतात, अशी माहिती ग्रामस्थांकडून समजली. नागरिकांच्या मागणीनुसार परिसरात पिंजरा व कॅमेरे लावण्यात येणार आहेत.

ही कार्यवाही नाशिक पश्चिम भागाचे उपवनसंरक्षक पंकज गर्ग, सहाय्यक वनसंरक्षक अनिल पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करीत आहेत जंगलात वावरताना लहान मुलांसह नागरिकांनी सावधानता बाळगावी." -श्रीमती सविता पाटील, वनपरिक्षेत्र अधिकारी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'वारीत कोणी विशेष अजेंडा चालवण्यासाठी येत असतील, तर ते आम्ही खपवून घेणार नाही'; CM फडणवीसांचा कोणाला इशारा?

Ashadhi Ekadashi : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विठ्ठलाची शासकीय महापूजा संपन्न; पंढरपुरात 20 लाखाहून अधिक भाविक दाखल

Ashadhi Ekadashi : विठ्ठलाच्या पूजेचा मान मिळालेले उगले दाम्पत्य कोण आहे? मुख्यमंत्र्यांसोबत मिळाला शासकीय महापूजेचा मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : 'महाराष्ट्र चालवण्याची विठुरायाने शक्ती द्यावी', मुख्यमंत्री फडणवीसांनी पांडुरंगाला घातले साकडे

SCROLL FOR NEXT