Zebra stripes in the city were not visible nashik news esakal
नाशिक

Zebra Crossing : शहरातील झेब्रा पट्टे झाले दिसेनासे; मनपा देईना दाद

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरातील बहुतांशी चौकांमध्ये झेब्रा (Zebra) पट्टे शोधूनही सापडत नाहीत. त्यामुळे चौक ओलांडून वाहनचालक पुढे थांबतात.

अशा वेळी वाहतूक पोलिसांकडून दंडात्मक कारवाई होते. (Zebra stripes in the city were not visible punitive action is taken by the traffic police nashik news)

मात्र, झेब्रा पट्टेच नसल्याने वाहनचालक आणि पोलिसांमध्ये वादाच्या ठिणग्या पडतात. यासंदर्भात शहर वाहतूक शाखेकडून महापालिकेला शहरातील चौकांमध्ये झेब्रा पट्टे मारण्यासंदर्भात वारंवार पत्राद्वारे पाठपुरावा केला आहे.

परंतु महापालिकेकडून कोणतीही दाद मिळत नसल्याने अखेर वाहतूक पोलिसांनी झेब्रा क्रॉसिंगच्या दंडात्मक कारवाया करणेच बंद केले आहे. दरम्यान, गेल्याच महिन्यात रस्ता सुरक्षा सप्ताह पार पडला होता. त्या वेळी काही मोजक्याच चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टे मारण्यात आले होते. त्यानंतर मात्र मनपाला शहरातील अन्य चौकाचाच विसर पडल्याचे यातून स्पष्ट होते आहे.

शहरातून मुंबई- आग्रा महामार्गासह नाशिक - पुणे, नाशिक- औरंगाबाद, नाशिक - त्र्यंबकेश्वर, नाशिक - गिरणारे, नाशिक - पेठ, नाशिक- सापुतारा हे राष्ट्रीय व राज्यस्तरीय मार्ग जातात. याशिवाय शहरांतर्गत उपनगरी रस्ते आहे. नाशिक शहर हद्दीमध्ये ५३ सिग्नल आहेत.

यातील महामार्गावरील चौक व सिग्नल वगळता राज्य मार्ग व उपनगरी मार्गांवरील सिग्नल व चौकांमध्ये झेब्रा पट्टे दिसेनासे झालेले आहेत. शहरातील प्रमुख चौकांमध्येही झेब्रा पट्टे नसल्याने त्या ठिकाणी वाहनचालक बेशिस्तीने सिग्नल ओलांडून थांबतात. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. कारवाई करताना पोलिसांशी वाहनचालक हुज्जत घालतात. मात्र झेब्रा पट्टे नसल्याने पोलिसांनाही माघार घ्यावी लागते.

हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

पत्रांना केराची टोपली

शहर वाहतूक शाखेकडून महापालिकेला चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्यासाठी वारंवार पत्रव्यवहार केला आहे. गेल्या महिन्यात वाहतूक शाखा आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठकही पार पडली.

त्यातही याबाबत चर्चा करण्यात आली आणि लवकरच झेब्रा क्रॉसिंग पट्टे मारण्याबाबत आश्‍वासन देण्यात आले. परंतु, अद्यापही महापालिकेकडून कारवाई होत नसल्याने एकप्रकारे वाहतूक पोलिस शाखेच्या पत्रांना केराचीच टोपली दाखविली जाते की काय, अशी शंका यानिमित्ताने उपस्थित होते आहे.

पादचाऱ्यांची कसरत

चौक वा सिग्नलच्या ठिकाणी झेब्रा क्रॉसिंग पट्टे हे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडण्यासाठी असतात. परंतु चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंगचे पांढरे पट्टेच राहिलेले नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना मोठी कसरत करावी लागते. अनेकदा वाहने खुपच पुढे येऊन थांबतात. त्या वेळी पादचाऱ्यांनाही मार्गक्रमण करताना वादावादीला सामोरे जावे लागते.

"बहुतांशी सिग्नल व चौकांमध्ये झेब्रा क्रॉसिंग पट्टे नाहीत. त्यामुळे पादचाऱ्यांना रस्ता ओलांडताना कसरत करावी लागते. वाहनचालकही पोलिसांची हुज्जत घालतात. यासाठी महापालिकेकडे अनेकदा पत्रव्यवहार करण्यात आला, परंतु त्यांना त्याचे गांभीर्यच नाही. त्यामुळे पोलिसांनाही कारवाई करणे कठीण जाते." - सुधीर डोंबरे, पोलिस निरीक्षक, वाहतूक शाखा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT