
Nashik News : ‘तबलिगी जमात’वर प्रतिबंध लावण्याची मागणी
जुने नाशिक : तबलिगी जमात देश आणि मुस्लिम समाजासाठी धोकादायक आहे. त्यांच्याकडून नेहमीच दहशतवादाला खतपाणी घातले जाते. त्यांच्यापासून असलेला धोका लक्षात घेऊन शहरात तबलीगी जमातवर कायम स्वरुपी प्रतिबंध लावण्यात यावा, अशी मागणी सुन्नी मुस्लिम बांधवांकडून करण्यात आली. (Demand to ban Tablighi Jamaat by sunni muslim community Nashik News)
हेही वाचा : कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...
याबाबतचे पोलीस आयुक्तांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, हाफिज जफर अनिस शेख हे ब्ल्युमुन सोसायटी येथिल मशीदमध्ये नमाज पठण करण्यासाठी गेले होते. त्याठिकाणी रफिक शेख नामक व्यक्तीने येवून सुन्नी विरुद्ध तबलीगी असा त्यांच्याशी वाद घातला.
त्यांच्यापासून धोका असल्याचे धर्मगुरू हाफिज सय्यद नदीम नुरी, हाफिज जफर यांनी सांगितले. तसेच, त्यांच्याकडून दहशतवादास खतपाणी घालण्याचे काम केले जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी.
त्यांना शहरात प्रतिबंध करण्यात यावा. अशी मागणी निवेदनाच्या माध्यमातून केली. यावेळी अॅड. शहेबाज शेख, सलीम शेख, मुजाहीद अन्सारी, बब्बु शेख, साजिद मुलतानी, परवेज शेख, इरफान फारुक आदी उपस्थित होते.