leopard attack esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Leopard Attack : रांझणीत बिबट्याच्या हल्ल्यात एकजण जखमी; बालकाच्या मृत्यूनंतर ग्रामस्थ भयभीत

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Leopard Attack : रांझणी (ता. तळोदा) येथे गुरुवारी (ता. १८) रात्री दहाच्या सुमारास बिबट्याने एका व्यक्तीवर हल्ला चढवून जखमी केल्याची घटना घडली.

दलेलपूर शिवारात दहावर्षीय बालकाच्या मृत्यूनंतर लागलीच रांझणीत पुन्हा बिबट्याचा हल्ला झाल्याने परिसरात प्रचंड दहशतीचे वातावरण निर्माण झाले. वन विभागाने बिबट्याचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

तालुक्यातील रांझणी येथे गोपाळपूर रस्त्यालगत जगदीश हिरालाल पाडवी (वय ४२) यांचे नाल्याशेजारी घर आहे. (One injured in leopard attack in Ranjani nandurbar news)

गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास जगदीश पाडवी घरात झोपले असताना अचानक घराच्या पाठीमागे त्यांना कोंबड्यांच्या फडफडण्याचा आवाज आला.

कोंबड्यांची फडफड ऐकून ते घराबाहेर पडले असता अचानक बिबट्याने त्यांच्यावरच हल्ला चढविण्याचा प्रयत्न केला. या वेळी जगदीश पाडवी यांनी प्रसंगावधान राखत स्वतःला वाचविण्यासाठी आपला डाव्या हाताच्या ठोशाने बिबट्याला बाजूला सारले.

त्यांनी जोरात आरोळी ठोकल्याने घराशेजारी राहणारे रहिवासी धावून आल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. दरम्यान, जगदीश पाडवी यांच्या हातावर बिबट्याने पंजाने ओरबाडून जखमी केले. ही वार्ता वाऱ्यासारखी गावात पसरल्यावर सागर गोसावी, प्रमोद सोनवणे, सोनू पाडवी, सुभाष पाडवी यांच्यासह तरुण व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली. या वेळी जखमी अवस्थेतील जगदीश पाडवी यांना तत्काळ तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, पुन्हा काही वेळानंतर त्याच परिसरात नाल्याशेजारील शेतात वराहाचा ओरडण्याचा आवाज आल्याने पुन्हा नागरिक भयभीत झाले.

हेही वाचा : Credit Card फसवणूक....काय घ्याल काळजी?

कोंबड्यांची शिकार हातातून निसटल्याने बिबट्याने वराहावर ताव मारला असावा, असा अंदाज उपस्थितांकडून व्यक्त करण्यात येत होता.

घटनेचे वृत्त ग्रामस्थांकडून वन विभागाला कळविण्यात आल्यानंतर तत्काळ वनक्षेत्रपाल स्वप्नील भामरे यांच्यासह वनरक्षक गिरधन पावरा, नामदेव डोंगरे, जाल्या पाडवी, वनपाल वासुदेव माळी यांची टीम घटनास्थळी हजर झाली. या वेळी जगदीश पाडवी यांच्या घराशेजारी चिखलात त्यांना ठिकठिकाणी बिबट्याच्या पंजाचे ठसे तसेच बिबट्याने दोन कोंबड्यांचा फडशा पाडल्याचे आढळले.

दरम्यान, रांझणी येथे एका मोठ्या व्यक्तीवर हल्ला चढविल्याने लोकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाली आहे. वन विभागाने परिसरात पिंजरे लावून बिबट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

‘वन विभागाने सक्रिय व्हावे’

रांझणी परिसरात एकाच वेळी दोन-तीन बिबटे एकत्र दिसण्याच्या घटना वारंवार घडत असतात. त्यामुळे परिसरात नेमके किती बिबटे आहेत यावर शंका-कुशंका व्यक्त होत आहेत. बिबट्यांची संख्या जाणून घेण्यासाठी विशेष मोहीम राबवावी व वन विभागाने सक्रिय होऊन बिबट्यांचा तत्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TCS Nashik case: टीसीएस नाशिकमध्ये खळबळ! धर्मांतरण-छळ आरोपांमुळे ऑफिस बंद, आंतरराष्ट्रीय संबंधांच्या संशयावरून तपास तीव्र

RCB vs LSG Live: विराट कोहलीच्या बाबतीत २ गोष्टी आज पहिल्यांदाच घडल्या... बंगळुरूची IPL 2026 Point Table मध्ये मोठी उलथापालथ

Pune DSK Vishw News: जीबीएसचा धोका कमी करण्यासाठी महापालिकेचा निर्णय; डीएसके विश्वला पावसाळ्यापूर्वी शुद्ध पाणीपुरवठा

Viral Video : हे, पाकिस्तानातच घडू शकतं... Run Out साठी खेळाडू चेंडू थ्रो करायचं सोडून घेऊन पळत सुटला... पोरीही हसल्या...

India AI : ओपनएआय अहवालात भारत आघाडीवर; एआयचा वापर चारपट वाढला, शहरांमध्ये टेक क्रांतीची लाटआघाडीवर...

SCROLL FOR NEXT