Online-Banking
Online-Banking 
उत्तर महाराष्ट्र

ग्रामीण भागात ऑनलाइन व्यवहारावर भर

विजय पगारे

इगतपुरी - नोटाबंदीनंतर नवीन नोटा आणि त्यांचा साठा पुरेशा प्रमाणात व्यवहारात उपलब्ध नव्हता. त्यामुळे ऑनलाइन व्यवहाराकडे सर्वसामान्य जनतेने वळावे, यासाठी सातत्याने प्रयत्न होत होते. शहरांबरोबर ग्रामीण भागातही त्यासाठी ॲपची माहिती देण्यात आली. सुरवातीला प्रयोग करणाऱ्या नागरिकांना आता ऑनलाइनची सवय जडली आहे. त्यामुळे एटीएम तसेच बॅंकांमध्ये गर्दीचे प्रमाण बऱ्याच प्रमाणात कमी झाले आहे.

कॅशलेस व्यवहारांना प्राधान्य द्यावे, यासाठी केंद्र सरकारसह विविध अधिकाऱ्यांकडून मार्गदर्शन केले जात होते. चलनी नोटा वापरण्याची सवय असल्याने कॅशलेस व्यवहार अंगवळणी पडण्यास बराच कालावधी गेला. सध्या ऑनलाइन व्यवहाराची सुलभता लक्षात आल्यानंतर अनेकांनी यालाच प्राधान्य दिले आहे. यासाठी गुगल पे, फोन पे, पेएटीएम यांसह इतर ॲप्सचा वापर केला जात आहे. ऑनलाइन व्यवहार केल्यास रिवॉर्ड म्हणून दहा ते पाचशे रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळत असल्याचेही ॲप वापरणाऱ्यांकडून सांगितले जात आहे. तरुणांचा ओढा ऑनलाइन व्यवहाराकडे अधिक असल्याचे दिसून येत आहे. कॅशबॅक तर मिळतोच, पण थेट बॅंक खात्यावर रक्कम जमा होत असल्याने अनेकांना एटीएमवर जाऊन कॅश काढून व्यवहार करणे वेळखाऊपणाचे वाटत आहे.

एटीएम केंद्राबाहेर लागणारा सुरक्षा कर्मचारी, एटीएम केंद्रामधील वातानुकूलित यंत्रणा, मासिक भाडे, विद्युत बिल, रोख रक्कम ठेवणाऱ्या कंपनी आकारत असलेले दर या बाबी खर्चिक होत चालल्या आहेत. पेट्रोलपंप, किराणा, कापड, मेडिकल अशा छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनी दुकानातच ऑनलाइन सुविधा सुरू केली आहे. एटीएम कार्ड घेऊन गेल्यास कोणतेही चार्जेस न घेता मोफत व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे ऑनलाइनकडे ग्राहकांचा ओढा असणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT