नाशिक - गोदावरीला पूर आल्याने बुधवारी गणेशवाडीतील रस्त्यावर भाजीबाजार भरला. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी.
नाशिक - गोदावरीला पूर आल्याने बुधवारी गणेशवाडीतील रस्त्यावर भाजीबाजार भरला. त्यामुळे झालेली वाहतूक कोंडी. 
उत्तर महाराष्ट्र

यंदा गोदावरी नदीला सहाव्यांदा पूर

सकाळवृत्तसेवा

पंचवटी - त्र्यंबकेश्‍वर परिसरात सुरू असलेल्या संततधारेमुळे गंगापूर धरणाच्या पाणीसाठ्यात पुन्हा वाढ झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पाटबंधारे खात्यातर्फे गोदावरीच्या पात्रात साडेचार हजार क्‍यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला. गोदावरीच्या पाणीपातळीत यंदा तब्बल सहाव्यांदा वाढ झाली. पुराचे पाणी दुथडी भरून वाहिल्याने गंगाघाटावर दर बुधवारी भरणारा आठवडे बाजार गणेशवाडी भागात भरला. त्यामुळे गाडगे महाराज पुलावर दिवसभर वाहतुकीची कोंडी होती. 

गेल्या काही दिवसांपासून उसंत घेतलेल्या वरुणराजाने पुन्हा बरसण्यास सुरवात केली. गंगापूर धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग करण्यात आला. त्यामुळे गंगाघाटावरील व्यावसायिकांचे धाबे दणाणले. त्यानंतर पावसाने उघडीप दिल्याने पुराचे पाणी अधिक वाढले नाही. यंदा तब्बल सहाव्यांदा गोदेच्या पात्राने पूरस्थिती अनुभवली. गंगाघाटावर दर बुधवारी आठवडे बाजार भरतो. मात्र पुरामुळे भाजी विक्रेत्यांनी मिळेल त्याजागी ठाण मांडत व्यवसाय सुरू केला. 

गोदावरीला पूरस्थिती असल्याने सर्वच सांडवे पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सहाजिकच अहिल्यादेवी होळकर, गाडगे महाराज, रामवाडी, टाळकुटेश्‍वर या पुलांवरील वाहतूकही वाढली. शहरातून जुन्या आडगाव नाक्‍याकडे जाण्यासाठी गाडगे महाराज पूल हा सर्वांत जवळचा मार्ग असल्याने या पुलावर कायमच मोठी गर्दी असते. त्यातच गेल्या काही दिवसांपासून गाडगे महाराज पूल पार्किंग पॉइंट बनल्याने वाहतुकीची मोठी कोंडी होत आहे. आजच्या आठवडे बाजाराने त्यात आणखी भर पडली आहे.

नाशिककरांच्या कराच्या पैशांतून गाडगे महाराज पुलालगत कोट्यवधी रुपये खर्चून भाजी विक्रेत्यांसाठी मंडई बांधण्यात आली. मात्र, मंडईचा ताबा पुन्हा भिकारी व व्यसनींनी घेतल्याने आठवडे बाजार रस्त्यावर भरतो. त्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी होते.
- किरण पानकर, शहर उपाध्यक्ष, राष्ट्रवादी युवक काँग्रेस

आठवडे बाजार रस्त्यावर भरू लागल्याने वाहतुकीसह अनेक प्रश्‍न उपस्थित होत आहेत. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे भाजीविक्रेते उरलेला माल तसाच टाकून जातात, त्यामुळे या भागातून चालणेही कठीण होते.
- संकेत कुलकर्णी, अभियांत्रिकी विद्यार्थी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT