उत्तर महाराष्ट्र

शहरात पार्किंगचा बोजवारा 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - काही महिन्यांपासून शहरात पार्किंगचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला असून, त्यातून मध्यवर्ती भागात किरकोळ वादाला तोंड द्यावे लागत आहे. वाहतूक पोलिसांकडून दुचाकी वाहने उचलली जात असल्याने कारवाईच्या भीतीने दुकानांसमोर व जागा मिळेल त्या ठिकाणी वाहने लावली जात असल्याने त्यातून वाद निर्माण होत आहेत. महापालिकेने पार्किंगची व्यवस्था करण्याबरोबरच पोलिसांकडूनदेखील रस्त्यालगतच्या वाहनांसाठी तारखा ठरवून देणे गरजेचे असताना त्याकडे दुर्लक्ष होत आहे. 

उन्हाळ्याच्या पार्श्‍वभूमीवर अनेक महानगरांमध्ये पिण्याच्या पाण्यावरून संघर्ष निर्माण होत असतानाच नाशिकमध्ये मात्र पार्किंगच्या प्रश्‍नाने वाहनधारकांना हैराण केले आहे. शहरातील सीबीएस, शालिमार, रविवार कारंजा, महात्मा गांधी रस्ता, शरणपूर रोड, गंगापूर रोड, अशोक स्तंभ, मेन रोड आदी भागात दुचाकी लावण्यासाठी जागा नाही. रस्त्यावर वाहने लावल्यास वाहतूक पोलिसांनी नियुक्त केलेल्या ठेकेदारांकडून वाहने उचलली जातात. शरणपूर रस्त्यावरील जुन्या पोलिस आयुक्तालयात वाहने जमा केली जातात. दुचाकी वाहने परत मिळविण्यासाठी तीनशे रुपये दंड अदा करावा लागतो. त्यामुळे कारवाईच्या भीतीने दुकानांसमोर पार्किंग केली जाते. परंतु वाहनांमुळे दुकाने झाकली जात असल्याने दुकानांसमोर थेट पंक्‍चर व नुकसानीच्या धमकीचे बोर्ड लावले जात आहेत. बळजबरीने वाहने लावण्याचा प्रयत्न झाल्यास हातघाईवर प्रकरणे येण्याचे प्रकार वाढले आहेत. 

मध्यवर्ती भागात समस्या 
शहरात पार्किंगची व्यवस्था करण्याची मुख्यत्वे जबाबदारी महापालिकेची असतानादेखील पार्किंग जागांचा विकास केला जात नाही. ऑन स्ट्रिट व ऑफ स्ट्रिट पार्किंगसाठी गंगापूर, शरणपूर रस्त्यावर रेखांकन केले असले तरी मध्यवर्ती भागात पार्किंगची समस्या असल्याने त्याकडे दुर्लक्ष होत आहे. पोलिसांनी सम व विषम तारखांना रस्त्यालगत वाहने लावण्याची सोय करणे गरजेचे असताना महात्मा गांधी रोड वगळता वर्दळीच्या ठिकाणी तशी सोय नाही. 

पार्किंगमधून कमाई 
शहरात दिवसा अडीच लाखांहून अधिक वाहने रस्त्यावर धावतात. त्यामुळे पार्किंगचा प्रश्‍न निर्माण झाला आहे. मिळकतमालकांच्या वाहनांना जागा मिळत नसल्याने त्यातून आता पार्किंगचा धंदा सुरू झाला आहे. नेहरू उद्यान, सीबीएस येथील खासगी जागांमध्ये ताशी दहा रुपये वाहने लावण्याचा दर आकारला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT