शार्पशूटर नवाबअली खान
शार्पशूटर नवाबअली खान 
उत्तर महाराष्ट्र

गावकऱ्यांचे आनंदाश्रू पाहून गहिवरलो - नवाबअली खान

शिवनंदन बाविस्कर

पिलखोड (ता. चाळीसगाव) - नरभक्षक बिबट्याला शनिवारी (ता. ९) ठार केल्यानंतर काल वरखेडे (ता. चाळीसगाव) ग्रामस्थांनी आमचे पेढे भरवून तथा फुलांचा वर्षाव करीत स्वागत केले. त्यांच्या सुटकेचे आनंदाश्रू पाहून मला गहिवरून आले, असे शार्प शूटर नवाब शाफतअली खान यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. तर आमच्या जवळच्या नातेवाइकांकडे लग्न होत पण बिबट्यामुळे जाणे अशक्‍य वाटत होते. मात्र, तो ठार झाल्यामुळे आम्हाला लग्नात हजेरी लावता आली, असे डॉ. नक्षबंदी या दोन्ही बंधूनी सांगितले.

ग्रामस्थांनी पेढे भरवले...
वरखेडेत आज सकाळी नवाबअली खान गेले असता गावकऱ्यांनी त्यांना पेढे भरवले. त्यांच्यावर फुलांचा वर्षाव केला. गावकऱ्यांच्या सुटकेचे आनंदाश्रू पाहून नवाब अली खान यांना गहिवरले होते. असे त्यांनी ‘सकाळ’शी बोलताना सांगितले. गावकऱ्यांच्या आमच्याकडून खूप अपेक्षा होत्या. त्यांच्या अपेक्षांना खरे उतरल्याने त्यांनी आमचे आभार व्यक्त केले. तसेच ग्रामस्थांनी आम्हाला केलेल्या सहकार्यामुळे नवाब अली खान यांनीही त्यांचे आभार मानले.

असे केले ‘शूट’
नवाबअली खान म्हणाले की, मी तीन रात्रं दिवस त्या भागात फिरलो. त्या सर्व परिसराचा अभ्यास केला. पिंपळवाड म्हाळसाच्या जंगल परिसरात मला बिबट्याची विष्ठा आढळली. त्यावरून असे निदर्शनास आले की, तो याच जंगलात विश्रांती घेतो. शनिवारी (ता. ९) रात्री साडेआठच्या सुमारा बिबट्या जंगलातून निघून गावाकडे यायला निघाला. त्यावेळी मी, माझा मुलगा अजगर अली खान, हसन, सबदर्द असे आम्ही तिघांनी ट्रॅप लावला.

बिबट्याने शेवटचे दोन मानवी बळी घेतलेली शिकार पूर्ण खाता आली नाही. 
त्यामुळे त्याची भूक अपूर्ण होती. गावच्या बाहेर काही पाच ते सहा तरुणांचा घोळका होता. बिबट्या त्यांच्या दिशेने हळूहळू जात होता. मी तसा त्याच्या मागे जात होतो. माझ्या मागे वन विभागाची संपूर्ण टीम होती. त्या मुलांच्या घोळक्‍यावर बिबट्या हल्ला करेल, असे  दिसताच मी क्षणाचाही विलंब केला नाही आणि त्याला शूट केले. वीस मीटर अंतरावरून मी त्याला शूट केले. त्याला शूट करण्यात मी दहा सेकंद जरी उशीर केला असता तर त्याने आणखी एक बळी घेतला असता. त्याला ठार झालेले बघताच वन विभागासह ग्रामस्थांनी सुटकेचा श्वास घेतला.

लग्नाला हजेरी लावता आली...
डॉ. सहाद व डॉ. सौद नक्षबंदी म्हणाले की, आम्ही काही दिवसांपासून वरखेडे भागात ठाण मांडून होतो. आमच्या जवळच्या नातेवाइकांकडे लग्न होते. पण, बिबट्यामुळे लग्नाला जाणे अशक्‍य वाटत होते. लग्नाला न गेल्यामुळे नातेवाईक नाराज झाले असते. शिवाय येथून अचानक निघून जाणे योग्यही नव्हते. मात्र, बिबट्या ठार झाल्यामुळे आम्हाला लग्नात हजेरी लावता आली.

बिबट्या, बछड्यापासून सावधान
एका बिबट्याला तर आम्ही ठार केले. पण या गिरणा परिसरात अजूनही मादी बिबट्या आणि बछडा असण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे शेतकरी व ग्रामस्थांनी सतर्क राहावे. शिवाय वन विभागाने त्यांनाही लवकरच ठार करावे. बिबट्याला शूट करण्यासंदर्भात राज्य सरकारने माझी राज्यभरात वन विभागाला ट्रेनिंग देण्यासाठी नियुक्ती केली आहे. चाळीसगाव वन विभागालाही ट्रेनिंग दिले जाणार आहे, असे नवाबअली खान यांनी सांगितले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT