prize
prize 
उत्तर महाराष्ट्र

निजामपूर-जैताणेत नाभिक समाजातर्फे गुणवंतांचा गुणगौरव

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : भामेर (ता.साक्री) शिवारातील म्हसाई माता मंदिराच्या प्रांगणात येथील नाभिक समाजबांधवांतर्फे संत सेना महाराज पुण्यतिथीनिमित्त नुकताच नाभिक समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह गुणगौरव करण्यात आला. सामाजिक कार्यकर्ते सुभाष सोनवणे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. तर म्हसाई ट्रस्टचे अध्यक्ष लक्ष्मीकांत शाह प्रमुख अतिथी होते.

सुरुवातीला लक्ष्मीकांत शाह, सुभाष सोनवणे आदींच्या हस्ते दीपप्रज्वलन व संत सेना महाराजांच्या प्रतिमेचे पूजन झाले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते विजय महाले, मोहन सूर्यवंशी, वसंत सूर्यवंशी, सुनील सूर्यवंशी, निजामपूर-जैताणे समाजाध्यक्ष शरद पवार, उपाध्यक्ष जनार्दन चित्ते, दुकानदार संघटनेचे साक्री तालुकाध्यक्ष मोहन सूर्यवंशी, सचिव अशोक महाले, निजामपूर-जैताणे शहराध्यक्ष शरद सूर्यवंशी, उपाध्यक्ष छोटू पवार आदींसह समाजबांधव उपस्थित होते. याप्रसंगी नाभिक समाजातील दहावी-बारावी व उच्च शिक्षणात नैपुण्य मिळवणाऱ्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पालकांसह मान्यवरांच्या हस्ते रोख बक्षिसे देऊन गुणगौरव झाला. 

गुणवंत विद्यार्थ्यांसह शिक्षक अनिल भदाणे, लक्ष्मीकांत शाह यांनी मनोगत व्यक्त केले. सुभाष सोनवणे यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शिक्षक रवींद्र हिरे यांनी सूत्रसंचालन केले. दुकानदार संघटनेचे साक्री तालुकाध्यक्ष मोहन सूर्यवंशी यांनी आभार मानले. स्नेहभोजनाने कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी नाभिक समाजबांधवांसह जिवा-सेना संघटना, दुकानदार संघटना, महिला मंडळ आदींनी विशेष सहकार्य केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Solapur Lok Sabha Election : शहिदांचा अन् जवानांचा अपमान सोलापूरकर करणार का? फडणवीसांची प्रणिती शिंदेवर जोरदार टीका

Nude Image Generator : अ‍ॅपलने अ‍ॅप स्टोअरवरुन काढून टाकले न्यूज इमेज बनवणारे Apps; इन्स्टावर जाहिराती दिसल्यानंतर कारवाई

Shrikant Shinde: 'पंजा'ला मतदानावरून ठाकरे X शिंदे, 'शिल्लक सेना' उल्लेख करत डागली तोफ

PM Modi Rally Solapur: एससी, एसटी आणि ओबीसींचे आरक्षण अल्पसंख्याकांना देण्याचा काँग्रेसचा डाव, पंतप्रधान मोदींचा घणाघात

Latest Marathi News Live Update: मोदींच्या कितीही सभा घेतल्या तरी उपयोग होणार नाही - पृथ्वीराज चव्हाण

SCROLL FOR NEXT