teachers
teachers 
उत्तर महाराष्ट्र

आयटीआय शिक्षकांचे प्रश्न विधान परिषदेत आवाज वळून मार्गी लावू

सकाळवृत्तसेवा

येवला - राज्यातील आयटीआय निदेशकांचे रखडलेले विविध प्रश्न विधान परिषदेत आवाज उठवून मार्गी लावू, यासाठी मंत्री महोदयांकडे बैठकही घेण्याचा आग्रह धरू असे आश्वासन शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी आयटीआय निदेशकांना दिले. आयटीआय निदेशक संघटनेने आज मुंबईत आझाद मैदानावर एक दिवसीय धरणे आंदोलन करून निदर्शने केले.

यावेळी दराडे यांनी त्यांची भेट घेऊन चर्चा करत आंदोलनाला पाठिंबा दिला. निदेशकांच्या विविध समस्या समजून घेत सातत्याने होणाऱ्या दुर्लक्षाकडे शासनाचे लक्ष वेधू असे यावेळी दराडे म्हणाले. संघटनेचे अध्यक्ष महादेव माळी, उपाध्यक्ष विनोद पाटील, सरचिटणीस विनोददुर्ग पुरोहित आदींनी यावेळी दराडे यांना निवेदन देत विविध मागण्या केलेल्या आहेत. आयटीआयच्या कौशल्य विकास व उद्योजकता या खात्यातील प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबितच व कागदोपत्री राहिलेले आहेत. या संदर्भात वेळोवेळी संघटनेने आंदोलने केली परंतु शासन स्तरावरून अक्षम्य दुर्लक्ष होत असून यामुळे प्रशिक्षण व्यवस्था कोसळण्याच्या मार्गावर असल्याची खंत माळी व पदाधिकाऱयांनी बोलून दाखविली.

या विभागात आज ५० टक्के शिक्षकीय पदे रिक्त आहेत त्यामुळे एका एका शिक्षकाकडे चार-चार तुकड्यांचा अतिरिक्त कारभार असून अध्ययन अध्यापनाचा दर्जा खालावत आहे. प्रात्यक्षिकांसाठी लागणार्या कच्च्या मालाचा निधी चार महिने देखील पुरत नाही. त्यामुळे तो वाढविण्याची गरज आहे. जुनाट यंत्रणा व हत्यारे निर्लेखित करून सर्व आयटीआयना अद्ययावत पाठ्यक्रम नुसार नवीन यंत्रसामुग्री व हत्यारे उपलब्ध करून द्यावीत, कालबाह्य सेवा प्रवेश नियम बदलावेत तसेच सर्वांना पदोन्नतीचा मार्ग उपलब्ध करून द्यावा अशी मागणी या आंदोलनादरम्यान निदेशकांनी केली असून तसे निवेदन श्री. दराडे यांना देण्यात आले. आज कडेलोटाच्या उंबरठ्यावर असलेल्या या खात्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी आमचा आवाज शासनापर्यंत पोहचावा व सकारात्मक निर्णय घेण्यास भाग पाडावे अशी मागणीही त्यांनी श्री दराडे यांच्याकडे केली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

Latest Marathi News Update: पुण्यात १० मे रोजी राज ठाकरेंची सभा; मोहोळ यांचा करणार प्रचार

ICC Champions Trophy 2025 : चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारत पाकिस्तानात जाणार? बीसीसीआयनं स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT