उत्तर महाराष्ट्र

प्रभारी महापौर गणेश सोनवणेंचा राजीनामा 

सकाळन्यूजनेटवर्क

प्रभारी महापौर गणेश सोनवणेंचा राजीनामा 
जळगाव, ः महापालिका 2013 च्या निवडणुकीची 19 सप्टेंबरपर्यंत मुदत आहे. त्यामुळे अजूनही 19 दिवस बाकी असताना खानदेश विकास आघाडीचे प्रभारी महापौर गणेश सोनवणे यांनी आज पदाचा राजीनामा आयुक्त चंद्रकांत डांगे यांच्याकडे दिला. अचानक राजीनामा दिल्याने महापालिका राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, सोनवणे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. 
महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत महापौर ललित कोल्हे यांनी निवडणुकीपूर्वी नऊ जुलैला राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला. त्यानंतर उपमहापौर गणेश सोनवणे यांच्याकडे 10 जुलैपासून प्रभारी महापौरपदाची जबाबदारी आली. त्यातच निवडणुकीमुळे गेल्या चार महिन्यांपासून महासभा न झाल्याने प्रभारी महापौर सोनवणे यांच्या अध्यक्षतेखाली 11 सप्टेंबरला पहिली आणि 2013 च्या पंचवार्षिक सभागृहाची शेवटची महासभा होणार होती. प्रशासनाकडून महासभेची विषयपत्रिका तयार करण्याचे काम सुरू होते; परंतु श्री. सोनवणे यांनी आज नगरसेवकपदाचा राजीनामा आयुक्तांकडे दिला. त्यामुळे महासभा होणार की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागून आहे. 

सोनवणे निवडणुकीपासून नाराज 
खानदेश विकास आघाडीने महापालिकेची 2018 ची निवडणूक शिवसेनेच्या चिन्हावर लढवली. मात्र, उपमहापौर सोनवणे यांचेच पक्षाकडून तिकीट कापल्याने निवडणुकीपासून ते पक्षश्रेष्ठींवर नाराज होते. तसेच शेवटची महासभा घेण्यासाठीही पक्षाकडून नकार होता. त्यानंतर पुन्हा होकार आल्याने पक्षश्रेष्ठींच्या या भूमिकेमुळे सोनवणे यांनी राजीनामा दिला असल्याची चर्चा आहे. 

"खाविआ'चे नेते अनभिज्ञ 
सोनवणे यांच्या राजीनाम्यासंदर्भात खानदेश विकास आघाडीचे प्रमुख रमेश जैन यांच्याशी संपर्क केला असता, ते बाहेरगावी होते. सोनवणे यांनी राजीनामा दिला, याबाबत काहीच माहिती नसून राजीनामा का दिला? केव्हा दिला? याबाबत काहीच माहिती नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे खानदेश विकास आघाडीचे नेतेच या राजीनाम्याबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसून आले. 
 

भाजपकडून स्वीकृत सदस्य होणार? 
गणेश सोनवणे हे खानदेश विकास आघाडी अथवा शिवसेनेचे मूळ कार्यकर्ते नाहीत. याआधीच्या "टर्म'मध्ये त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून निवडणूक लढविली आणि नगरसेवक झाले होते. मावळत्या "टर्म'मध्ये ते खानदेश विकास आघाडीचे सदस्य होते. आता नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर ते भाजपमध्ये प्रवेश करणार असून, त्यांना त्यासाठी स्वीकृत सदस्यपदी घेण्याचे आश्‍वासन मिळाल्याची चर्चा सुरू आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sangli Lok Sabha : 'जयंत पाटील काड्या करण्यात आणि संजय पाटील थापेबाजीत पटाईत'; माजी आमदाराची जोरदार टीका

Babil Khan: इरफान खानच्या लेकाचं होतंय कौतुक; पाण्याच्या समस्येसाठी काम करणाऱ्या संस्थेला केली मोठी आर्थिक मदत

Lok Sabha Election: PM मोदींच्या सभेमुळे ६ ठिकाणी वाहनतळ, ५ ठिकाणचे रस्ते बंद, २० मिनीटे अंत्ययात्रा रोखली

Mumbai Crime News: मानखुर्दमध्ये २७ वर्षीय तरुणीची हत्या; 'लव्ह जिहाद' म्हणत धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न

Latest Marathi News Live Update : तुमची संपत्ती लुटणारं सरकार तुम्हाला हवं आहे का? पंतप्रधान मोदींची पुन्हा काँग्रेसवर टीका

SCROLL FOR NEXT