Crime
Crime 
उत्तर महाराष्ट्र

सीटू युनियनच्या कामगारांवर खंडणीचा गुन्हा 

सकाळवृत्तसेवा

नाशिक - सातपूर औद्योगिक वसाहतीतील जेएम इंजिनिअरिंगतील संपावर असलेल्या कामगारांनी कंपनीच्या उद्योजिकेला रस्त्यात अडवून पैशांची मागणी केली. पैसे न दिल्यास कंपनी बंद पाडण्याची आणि मुलांना ठार मारण्याची धमकी देत त्यांच्या चारचाकी वाहनाचे नुकसान केल्याची घटना घडली. याप्रकरणी हिना दिपेश चांगराणी (रा. महात्मानगर) यांच्या फिर्यादीनुसार, सातपूर पोलिसात संशयित प्रशांत जगताप, तुषार गौड, सागर सुखलाल बडगुजर, सचिन देशमुख, गोकूळ साळुंखे, वसंत शिरोळ यांच्याविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

हिना चांगराणी यांची सातपूर औद्योगिक वसाहतीमध्ये जेएम इंजिनिअरिंग या नावाची कंपनी आहे. त्यांच्या कंपनीमध्ये सीआयटीयु या कामगार संघटनेची युनियन असून, गेल्या काही दिवसांपासून या युनियनशी संबंधित कामगारांनी अनधिकृतरित्या संप पुकारला आहे. यासंदर्भात तडजोडीच्या उपाययोजनाही करून झाल्या परंतु, तरीही संप मिटलेला नाही. 

दरम्यान, गेल्या शनिवारी (ता.5) रात्री साडेदहा वाजेच्या सुमारास कंपनीतील संपावरील कामगार प्रशांत जगताप, तुषार गौड, सागर बडगुजर, सचिन देशमुख, गोकुळ साळुंखे यांनी अन्नापूर्णा हॉटेलजवळ हिना चांगराणी यांना अडविले. त्यांच्याकडे संप मिटविण्यासाठी पैशांची मागणी केली. हिना चांगराणी यांनी पैसे देण्यास नकार दिला असता, संशयितांनी कंपनी बंद पाडण्याची धमकी दिली. तसेच त्यांच्या मुलांसह त्यांना जीवे ठार मारण्याची धमकी दिली. 

त्यानंतर गेल्या सोमवारी (ता.7) रात्री साडेनऊ वाजेच्या सुमारास कंपनीच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली हिना चांगराणी यांच्या मालकीच्या होंडा सिटी कारला आयशर ट्रकने पाठीमागून धडक देत नुकसान केले. याप्रकरणी सातपूर पोलिसात संशयितांविरोधात खंडणीचा व जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पालकमंत्र्यांकडेही मागितली दाद 
जेएम इंजिनिअरिंगमध्ये गेल्या काही महिन्यांपासून सीटू युनिटनच्या कामगारांनी अनधिकृतरित्या संप पुकारला आहे. त्यावर तोडगा काढण्यासाठी प्रयत्न केल्यानंतरही युनियनकडून आडमुठ्ठेपणा केला जात आहे. त्यासंदर्भात कंपनीच्या हिना चांगराणी यांनी पालकमंत्र्यांकडेही दाद मागितली होती. मात्र त्यातही अपयश आले. या प्रकारामुळे उद्योजकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar "मी आजही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातून बाहेर पडलेलो नाही" अजित पवार असं का म्हणाले?

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईचीही सुरावात खराब; चार फलंदाज तंबूत

Ajit Pawar Sakal Interview : ''मला संधी दिली म्हणता मग ज्यांनी पवार साहेबांना संधी दिली त्यांचं...'' अजित पवारांचा शरद पवारांवर थेट निशाणा

Sunetra Pawar: बारामतीत सुनेत्रा पवारांची उमेदवारी भाजपच्या दबावातून दिली का? अजित पवारांनी स्पष्टच सांगितलं

Rahul Gandhi Pune Sabha : ''मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत...'' राहुल गांधींनी पुण्याच्या सभेत सांगितलं कारण

SCROLL FOR NEXT