mehunbare
mehunbare 
उत्तर महाराष्ट्र

तामसवाडीच्या पुनर्वसनासाठी गावठाण जागेची पहाणी

दीपक कच्छवा

मेहुणबारे (चाळीसगाव) :- वरखेडे (चाळीसगाव) येथील वरखेडे- लोंढे बॅरेजच्या कामावर तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील ग्रामस्थासह महिलांनी आधी पुनर्वसन मगच धरण असा पावित्रा घेतला होता. त्यानंतर येथे आज अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर व पुनर्वसन अधिकारी श्रीमती भारदे यानी आज बैठक घेऊन गावठाण जागेची पाहणी केली.

वरखेडे - लोंढे बॅरेज प्रकल्पाचे कामावर काही महीन्यापुर्वी ठिय्या आंदोलन करून काम बंद पाडले होते. त्यानंतर पुन्हा या कामाला पोलिस बंदोबस्तात कामाला सुरुवात केली. त्यानंतर एक महिन्याची मुदत ग्रामस्थांनी दिलेली होती. आज दुपारी बारा वाजता तामसवाडी येथे अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर जिल्हा पुनर्वसन अधिकारी श्रीमती भारदे, तहसीलदार कैलास देवरे, कार्यकारी अभियंता पी. आर. मोरे, उप कार्यकारी अभियंता सचिन पाटील यांच्या उपस्थितीत बैठक झाली. या बैठकीत ग्रामस्थांचे म्हणने ऐकुन घेतले. 

श्री गाडीलकर यांनी प्रक्लपात पाणी अडविण्याच्या अगोदर तुमचा पुनर्वसनाचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे देखील आश्वासन यावेळी अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिले. या बाबतीत काही अडचणी थेट माझ्याशी दूरध्वनीवरून संपर्क करावा तसेच ग्रामस्थांनी दाखवलेल्या जागेची देखील पहाणी करत प्रकल्प बाधित  कृती समितीचे अध्यक्ष सदाशिव पाटील यांच्याशी चर्चा करून लवकरात लवकर तुमचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल असे सांगितले. यावेळी ग्रामस्थांची देखील सहकार्य करण्याची भूमिका घेतली. या पहाणीचा अहवाल हा शासनाला सादर करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

वरखेडे लोंढे बॅरेजची पहाणी
तामसवाडी (ता.चाळीसगाव) येथील पहाणी दौरा झाल्यावर अप्पर जिल्हाधिकारी गोरक्ष गाडीलकर व पुनर्वसन अधिकारी श्रीमती भारदे तहसिलदार कैलास देवरे यांनी वरखेडे - लोंढे बॅरेज प्रकल्पाची माहिती घेवुन डाव्या व उजव्या बाजुच्या तसेच गिरणा पात्रात सुरू असलेल्या कामाची पहाणी केली.या प्रकल्पाचे होत असलेल्या कामाविषयी श्री. गाडीलकर व श्रीमती भारदे यांनी  समाधान व्यक्त केले. या प्रकल्पाच्या कामाच्या संदर्भातील माहिती कार्यकारी अभियंता पी.आर.मोरे यांनी दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Congress : ''चार जूननंतर काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! एक काँग्रेस राहुल गांधींची तर दुसरी...'' प्रमोद कृष्णम् यांचा दावा

Viral Video: 'माझ्या आयुष्यातून निघून जा'; मेट्रोमध्येच भिडलं जोडपं, एकमेकांना मारल्या चापटा

Akshaya Tritiya 2024 : कुंडलीतील पितृदोष दूर करण्यासाठी अक्षय्य तृतीयेला करा हे उपाय, घरात नांदेल सुख-शांती 

Rohit Sharma T20 WC 24 : टी 20 वर्ल्डकप तोंडावर आलाय अन् रोहित पुन्हा फेल गेला... माजी खेळाडूनं व्यक्त केली चिंता

नववधूने तब्येत ठीक नसल्याचं सांगत अंगाला स्पर्श करु दिला नाही, दहाव्या दिवशी दाखवले रंग!

SCROLL FOR NEXT