जळगाव - नूतन मराठा महाविद्यालयातर्फे गुरुवारी आयोजित ‘रेसेस-२०१६’ च्या उद्‌घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल.
जळगाव - नूतन मराठा महाविद्यालयातर्फे गुरुवारी आयोजित ‘रेसेस-२०१६’ च्या उद्‌घाटनप्रसंगी दीपप्रज्वलन करताना जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल. 
उत्तर महाराष्ट्र

संशोधक, प्राध्यापकांनो, प्रदूषण समस्येवर उपायांसाठी पुढाकार घ्या

सकाळवृत्तसेवा

जळगाव - प्रदूषण ही एक जागतिक समस्या असून, समाजात यासंदर्भात जनजागृती करणे काळाची गरज आहे. त्यासाठी संशोधक, प्राध्यापक यांसारख्या लोकांनी पुढाकार घेऊन काम केल्यास प्रदूषण कमी होण्यास मदत होईल, असा सूर नूतन मराठा महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय परिषदेत उमटला.

नूतन मराठा महाविद्यालयात आज झालेल्या ‘रिसेंट ॲडव्हान्सेस इन केमिकल एन्व्हायर्नमेंटल सायन्सेस’ या विषयावरील परिषदेचे उद्‌घाटन जिल्हाधिकारी रुबल अग्रवाल यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष नरेंद्र पाटील, तर प्रमुख अतिथी म्हणून उच्च व तंत्र विभागाचे सहसंचालक डॉ. केशव तुपे, संस्थेचे उपाध्यक्ष प्रा. डी. डी. बच्छाव, ‘उमवि’च्या ‘बीसीयूडी’चे संचालक प्रा. पी. पी. माहुलीकर, प्रा. डॉ. एम. डी. जहागीरदार, प्रा. के. एन. मोगरकर, प्राचार्य डॉ. एल. पी. देशमुख, परिषदेच्या संयोजिका प्रा. माधुरी पाटील, समन्वयक बी. आर. पाटील उपस्थित होते.

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. देशमुख यांनी प्रास्ताविकात परिषद आयोजनाची भूमिका मांडली. प्रा. डॉ. जहागीरदार यांनी रसायनशास्त्र आणि प्रदूषण या एकाच नाण्याच्या दोन बाजू असून, यादृष्टीने सामाजिक बांधिलकीतून संशोधकांनी संशोधन करावे, असे आवाहन उपस्थितांना केले. प्रा. बच्छाव यांनी संस्थेचा आढावा घेत अन्नभेसळीसंदर्भात जागृती होण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले.

रुबल अग्रवाल यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन व पोस्टर प्रदर्शनाचे उद्‌घाटन करण्यात आले. प्रा. एन. जे पाटील यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. डॉ. माधुरी पाटील यांनी आभार मानले.  

१५६ संशोधकांचा सहभाग
परिषदेस राज्यभरातून १५६ संशोधक, प्राध्यापकांनी सहभाग नोंदविला. यात प्रत्येकाने उत्कृष्ट पद्धतीने विषयाला अनुसरून संशोधन केलेले होते. दुपारच्या सत्रात या शोधनिबंधांचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी त्यांना ‘उमवि’च्या अधिसभा सदस्या प्रा. रत्नमाला बेंद्रे, प्रा. व्ही. एस. गिते यांनी मार्गदर्शन केले. प्रा. राजेंद्र देशमुख यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. बी. आर. पाटील यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT