A robbery at home in Unkai
A robbery at home in Unkai 
उत्तर महाराष्ट्र

अनकाई येथे लहान मुलांना ओलीस धरत घरावर दरोडा

सकाळवृत्तसेवा

येवला : अनकाई येथे जाधव यांच्या वस्तीवर आठ जणांनी दरोडा टाकून 1 लाख 29 हजाराचा ऐवज जबरदस्तीने लंपास केला आहे. चोरट्यांनी लहान मुलांना ओलीस धरून घरातील सोने व रोख पैसे काढून घेतले आहेत.  

पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. सुधीर जाधव यांनी येवला-मनमाड महामार्गालगत सुमारे 200 मीटर आत अनकाई शिवारात नुकताच बंगला बांधला असून महिन्यापूर्वीच ते येथे राहण्यासाठी गेले आहेत. नेहमीप्रमाणे ते झोपलेले असतांना रविवारी पहाटे 3 वाजून 44 मिनिटांनी अज्ञातांनी दरवाजा वाजवत लहान मुल आजारी आहे, दरवाजा उघडा असा आवाज दिला. या आवाजाने हॉल मध्ये झोपलेली मुले जागी झाली. मुलीने खिडकी उघडून पाहिले असता तोंड बंधुलेले चार-पाच जण दिसून आले. डॉ.जाधव व कुटुंबीय वरील मजल्यावर झोपलेले असल्याने मुलगी चोर-चोर आवाज देत त्यांना उठवण्यासाठी वरती पळत गेली. तोवर चोरट्यांनी दरवाजा हातोड्याने तोडून घरात प्रवेश करून मुलाच्या गळ्याला चाकू लावला होता. समोरील दृश्य पाहून जाधव यांनी मारहाण करू नका, जे पाहिजे ते घेऊन जा असे आवाहन केले.

यावर, एकाने मुलाच्या गळ्याला चाकू लावून ठेवला तर इतरांनी घरातील सोने काढले.शेवटी डॉ.जाधव यांच्या गळ्याला चाकू लावत रोख रकमेची मागणी केली. जाधव यांनी रोख पैसे नसल्याचे सांगितले मात्र याचवेळी घाबरलेल्या त्यांच्या आईने जवळील पैसे काढून दिले.विशेष म्हणजे आईचे दागिने ओरबडू नका काढून घ्या, मारू नका असे आवाहन डॉ.जाधव यांनी केले व त्यांनी ते ऐकलेही. शिवाय अगोदर डॉक्टराशी एकेरी बोलणारे हे चोर नंतर अहोजाहो करून बोलत होते. एका सफेद रंगाच्या गाडीतून आलेल्यापैकी एक गाडीत, एक घराबाहेर व सहा जण घरात असे आठ लोक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

दरोडेखोरांनी कुणालाही मारहाण केलेली नाही. घरात दोन मुले, दोन मुली, स्वतः डॉक्टर सुधीर जाधव व त्यांच्या आई असा परिवार होता या संपूर्ण घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेनंतर दहाच मिनिटांत पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. मालेगावचे पोलीस उपअधीक्षक हर्ष पोतदार यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. पोलीस निरीक्षक बाळासाहेब भापकर तपास करत आहेत. तर क्राईम ब्रँचचे पोलीस निरीक्षक अशोक कर्पे यांच्या मार्गदर्शनाखाली स्वप्नील नाईक, भारत कांदळकर, शांताराम घुगे, रावसाहेब कांबळे, प्रवीण काकड यांनी तपासाला दिशा दिल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

आता मसाल्यातही भेसळीची फोडणी! लाकडाचा भुसा, Acid चा वापर; १५ टन बनावट मसाला जप्त

Aavesham: 30 कोटींचं बजेट अन् कमाई 140 कोटी; ब्लॉकबस्टर ठरला फहाद फासिलचा आवेशम, ओटीटीवर कधी होणार रिलीज?

Karan Johar : "आई सोबत टीव्ही पाहत होतो पण.. " करण जोहर भडकला, कॉमेडीयनने मागितली माफी; कोण आहे केतन सिंह ?

Gadchiroli: स्फोटकांनी भरलेले 6 प्रेशर कुकर अन् डिटोनेटर नष्ट...मातीच्या खाणींचा शोध घेण्यासाठी गेलेल्या जवानांची कारवाई

Sunil Gavaskar Video : गावसकरांचा जुना VIDEO व्हायरल, रनरेटवरून विराटवर टीका केल्यानंतर झाले ट्रोल

SCROLL FOR NEXT