Live Photo
Live Photo 
उत्तर महाराष्ट्र

"गुगल'ने नाशिकमध्ये काही तासांत शोधला चोरटा 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : आधुनिक युगात काहीही माहिती हवी असेल, तर हमखास "गुगल'वर शोध घेतला जातो. पण "गुगल'ने चक्‍क दुकानातून माल लंपास करणाऱ्या चोरट्याचा शोध लावला आहे. पण हा "गुगल' इंटरनेटचे सर्च इंजिन नसून नाशिक पोलिसांच्या श्‍वानपथकातील "गुगल' नावाचा श्‍वान आहे.
शनिवारी (ता. 17) उपनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल झाल्यावर पाहणीदरम्यान आढळलेल्या बुटामुळे गुन्हा उघडकीस आला आहे. शिखरेवाडी येथील समर्थ अपार्टमेंट येथील बंद गुदामात चोरट्यांनी गरम मसाला, धना पावडर असा सुमारे सहा हजारांचा माल चोरल्याची फिर्याद दिलीप पीतांबरभाई पटेल यांनी दिली. शनिवारी फिर्याद प्राप्त होताच उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने सहाय्यक पोलिस निरीक्षक संतोष खडके यांनी घटनास्थळाची पाहणी केली. त्या वेळी तेथे काळ्या रंगाचे बूट आढळल्याने, तातडीने श्‍वानपथकाला पाचारण करण्यात आले. नाशिक पोलिस श्‍वानपथकातील डॉग हॅंडलर गणेश कोंडे यांनी "गुगल' या श्‍वानाला घटनास्थळावर असलेल्या बुटांचा वास दिला असता "गुगल' चोरट्याच्या मागावर निघाला. "गुगले'ने माग काढून घटनास्थळापासूनजवळ पण किचकट अशा महात्मा फुलेनगर येथील एका झोपडपट्टीत लपून बसलेल्या रेकॉर्डवरील गुन्हेगार इंद्रजित ऊर्फ इंद्या राजू वाघ (वय 19) याचा शोध घेतला. संशयित इंद्रजित सोफ्याखाली लपलेला असताना, त्याला शोधून काढले. यानंतर झोपडीची झडती घेतली असता, गुन्ह्यातील चोरीस गेलेला सुमारे सहा हजारांचा माल मिळून आल्याचे पोलिसांनी म्हटले आहे. "गुगल'मुळे काही तासांतच या गुन्ह्याची उकल होण्यास मदत झाली. 
उपनगर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारतकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली प्रकटीकरण पथकाचे संतोष खडके यांच्यासह गोडसे, देशमुख, वानखेडे, श्‍वानपथकाचा श्‍वान गुगल आणि डॉग हॅंडलर गणेश कोंडे, बी. बी. मोरे, अरुण चव्हाण, देसाई यांनी संयुक्‍तिक कामगिरी करून काही तासांत गुन्हा उघडकीस आणला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naresh Goyal: 'माझ्या पत्नीला कॅन्सर, मला तिच्यासोबत काही महिने राहायचे आहे'; नरेश गोयल यांची याचिका, कोर्टाने काय म्हटले?

Latest Marathi News Live Update : राज्यातील अनधिकृत शाळा होणार बंद!

MI vs KKR : मुंबई प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडल्यानंतर कर्णधार पांड्याने कोणावर फोडले पराभवाचे खापर?

'कडकनाथ'चे बुडवलेले बाराशे कोटी आधी शेतकऱ्यांना द्या; सदाभाऊंचे भाषण सुरू असतानाच भर सभेत युवकाचा सवाल

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला सोन्या-चांदीची खरेदी का केली जाते? जाणून घ्या कारण अन् महत्व

SCROLL FOR NEXT