chalisgaon
chalisgaon 
उत्तर महाराष्ट्र

‘सकाळ रिलीफ फंडा’ची जलसंधारणाला साथ 

दीपक कच्छवा

मेहुणबारे (ता. चाळीसगाव) : चाळीसगाव तालुक्यातील सहा गावांमध्ये जलसंधारणाच्या चळवळीला ‘सकाळ रिलीफ फंडा’ची मोलाची साथ मिळाली आहे. आज ‘सकाळ माध्यम समुहा’च्या तनिष्का गटाच्या माध्यमातून वरखेडे, कळमडू, कुंझर, धामणगाव व रांजणगाव या पाच गावांमध्ये नाला खोलीकरण कामांचा प्रारंभ करण्यात आला. या कामांमुळे पाणीटंचाईवर मात करणे शक्य होणार असल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले. 

चाळीसगाव तालुक्यातील पाच गावांमध्ये आज ‘सकाळ रिलीफ फंडा’तून होणाऱ्या कामांचा मोठ्या धडाक्यात प्रारंभ करण्यात आला. वरखेडे (ता. चाळीसगाव) येथील तांड्यावर सकाळी अकराला सरपंच अर्चना पवार व ‘सकाळ’च्या जळगाव खानदेश आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले. तनिष्का व्यवस्थापक अमोल भट, चाळीसगाव विभागीय कार्यालयाचे उपसंपादक आनन शिंपी यांच्यासह तनिष्का सदस्या तथा चाळीसगावच्या नगरसेविका सविता राजपूत, मीनाक्षी पाटील, लताबाई जाधव, माधवी कावरे व ‘तनिष्का’ गटातील सर्व सदस्या व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी श्री. रनाळकर यांनी बंजारा समाजातील महिलांच्या समस्या ऐकून घेत मार्गदर्शन केले. 

कळमडू 
कळमडू (ता. चाळीसगाव) गावात दुपारी बाराला गाव तलावाच्या खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ तनिष्का गटाच्या सदस्या कौशल्याबाई सोनवणे, छायाबाई बागूल, शोभाबाई सोनवणे व राहुल रनाळकर यांच्या हस्ते नारळ वाढवून करण्यात आला. तनिष्का व्यवस्थापक अमोल भट यांनी महिलांना मार्गदर्शन करून या कामासाठी लोकसहभाग वाढवावा, असे आवाहन केले. 

कुंझर 
कुंझर (ता. चाळीसगाव) गावातील विठ्ठल मंदिरात तनिष्का गटातील महिलांसह ग्रामस्थांची बैठक झाली. बैठकीत जळगाव आवृत्तीचे निवासी संपादक राहुल रनाळकर यांनी या बैठकीत आपण करीत असलेले काम आपले स्वतःचे आहे, असे समजून एकजुटीने काम करावे. जास्तीत जास्त लोकसहभाग वाढल्यास चांगले काम होईल, असे श्री. रनाळकर यांनी सांगितले. अमोल भट यांनी महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी या बैठकीत तनिष्का गटाच्या महिलांसह ग्रामस्थांनी निवासी संपादक राहुल रनाळकर, अमोल भट यांचा सत्कार केला. गावाजवळच्या नाल्याच्या खोलीकरण कामाचा शुभारंभ सरपंच अंजुबाई सोनवणे, रंजनाबाई सूर्यवंशी, मनीषा महाजन, मंगल चौधरी, शारदा गोसावी, रत्ना राजपूत, मीराबाई गुरव यांच्या हस्ते करण्यात आला. आदर्श शिक्षक किशोर पाटील कुंझरकर यांनी आभार मानले. 

धामणगाव 
धामणगाव (ता. चाळीसगाव) येथील विठ्ठल मंदिरात आज दुपारी दोनला तनिष्का गटाची बैठक झाली. ‘सकाळ’चे निवासी संपादक राहुल रनाळकर, आयकर विभागाचे उपायुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण, तनिष्का व्यवस्थापक अमोल भट आदी उपस्थित होते. श्री. रनाळकर यांनी ‘सकाळ रिलीफ फंडा’च्या माध्यमातून महाराष्ट्रात होत असलेल्या कामांची माहिती दिली. श्री भट यांनी महिलांना मार्गदर्शन केले. नाला खोलीकरण कामाचा तनिष्का सदस्या उषाबाई निकम, आशाबाई पाटील, बेबाबाई पवार, माधुरी निकम, दमयंताबाई निकम, संगीता काकडे, यांच्या हस्ते नारळ वाढवून कामाचा शुभारंभ करण्यात आला. तुषार निकम, सुनील पवार यांच्यासह महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

रांजणगाव 
रांजणगाव (ता. चाळीसगाव) येथे दुपारी चारला सद्गुरू माधवगिरी महाराज मंदिरात बैठक झाली. बैठकीत आयकर विभागाचे उपायुक्त उज्ज्वलकुमार चव्हाण यांनी तनिष्का गटाच्या महिलांसह व ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. या ठिकाणी नाला खोलीकरण कामाचा शुभारंभ सरपंच सोनाली निंबाळकर, पंचायत समितीच्या सुनीता पाटील, सुनीता सूर्यवंशी, शेरबानू अलीम यांच्याहस्ते नारळ वाढवून करण्यात आला. याप्रसंगी राहुल रनाळकर यांनी सकाळ रिलीफ फंडातून होणाऱ्या विविध कामांची माहिती दिली. अमोल भट यांनी महिलांना मार्गदर्शन करून ग्रामस्थांना लोकसहभाग वाढवून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे, असे आवाहन श्री. भट यांनी केले

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT