Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

नाशिकमध्ये एमडी ड्रग्ज्‌ विक्री करणाऱ्या दोघांना अटक 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : ड्रग्ज्‌च्या विळख्यात सापडलेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थ्यास पोलिसांनी विश्‍वासात घेऊन, एमडी ड्रग्ज्‌ची विक्री करणाऱ्या दोघांना अटक करण्यात आली आहे. मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून सदरची कारवाई केली असून संशयितांकडून सुमारे 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान, सदरच्या घटनेमुळे शहरातील तरुणाई ड्रग्ज्‌च्या विळख्यात सापडल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. 

साहील शरफोद्दीन पठाण (21, रा. रसुलबाग कब्रस्तान, खडकाळी, भद्रकाली), नवाज रियाज सैयद (19, रा. मदिना हेरिटेज, सह्याद्री हॉस्पिटलजवळ, मुंबई नाका) अशी दोघा संशयितांची नावे आहेत. पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या पथकातील पोलीस उपनिरीक्षक महेश हिरे यांना शहरातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना अंमली पदार्थांच्या विळख्यात अडविण्यात येत असल्याची खबर मिळाली होती. त्यानुसार, त्यांनी प्रमोद महाजन गार्डनजवळून एमडी ड्रग्ज्‌च्या आहारी गेलेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यास ताब्यात घेतले होते. त्यासंदर्भात मध्यवर्ती गुन्हेशाखेला माहिती देण्यात आल्यानंतर त्यांनी संबंधित विद्यार्थ्यांकडे कसून चौकशी केली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी एमटी ड्रग्ज्‌ (मेफेड्रॉन) विकणाऱ्या दोघांशी संपर्क साधत पोलिसांनी ड्रग्ज्‌ खरेदीचा बनाव रचला. त्यानुसार, दोघे संशयित मायको सर्कल येथे आले असता, मध्यवर्ती गुन्हेशाखेच्या पथकाने सापळा रचून दोघांना शिताफीने अटक केली. त्यांची अंगझडती घेतली असता, त्यांच्याकडून 4 ग्रॅम वजनाची एमडी ड्रग्ज्‌ व अन्य मुद्देमाल असा 38 हजार 100 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी मुंबई नाका पोलिसात एनडीपीएस कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली मध्यवर्ती गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक डॉ. सीताराम कोल्हे, पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले, सहायक पोलीस निरीक्षक धर्मराज बांगर, उपनिरीक्षक महेश हिरे, महेश शिंदे, हवालदार दिलीप ढुमणे, मिलींद बागुल यांच्या पथकाने केली आहे. 

एमडीचा तरुणाईला विळखा 
गेल्या वर्षीही गुन्हेशाखेच्या युनिट एकच्या पथकाने इंदिरानगर परिसरात एमडी ड्रग्ज्‌ची विक्री करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश केला होता. लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त केले होते. भुख्की नावाने विक्री होणारे ते ड्रग्जही एमडी ड्रग्जच होते. महाविद्यालयीन तरुणाईमध्ये या ड्रग्जची चलती आहे. 2 हजार रुपयांची एक भुख्की विकली जाते. सदरचे ड्रग्ज्‌ मुंबईतून नाशिकमध्ये दाखल होते. त्या कारवाईंनंतर वचक बसण्याची शक्‍यता होती. परंतु आत्ताच्या कारवाईमुळे अंमलपदार्थांचे हे रॅकेट शहरात पुन्हा सक्रिय झाले असून त्याला महाविद्यालयीन विद्यार्थी बळी पडत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Praniti Shinde : ''मविआची सत्ता असतानाही मंत्रिपदासाठी मी लॉबिंग केलं नाही , कारण...'' प्रणिती शिंदे नेमकं काय म्हणाल्या?

IPL 2024 LSG vs RR Live Score : खराब सुरूवातीनंतर लखनौनं डाव सावरला; राहुलची आक्रमक फलंदाजी

DC vs MI, IPL 2024: डेव्हिडचा कडक षटकार, मात्र संपूर्ण स्टेडियम हळहळलं; पाहा कोण जखमी झालं?

Hardik Pandya DC vs MI : सतत हसत असणाऱ्या पांड्या दिल्लीविरूद्ध मात्र जाम भडकला; Video व्हायरल

Loksabha election 2024 : सभा घ्यायला आल्या अन् विकासाचा मुद्दा विसरुन गेल्या; प्रियांका गांधींनी मराठवाड्यासाठी शब्दही काढला नाही

SCROLL FOR NEXT