Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

मानसिक आरोग्य दिनालाच तिघांनी मृत्युला कवटाळले 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहरात गेल्या गुरुवारी (ता.10) जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्ताने विविध उपक्रमांतर्गत समाजातील वाढत्या आत्महत्त्येच्या घटनांना सामाजिक प्रबोधन व जनजागृतीच्या माध्यमातून या आळा घालण्याचे विचारमंथन सुरू असताना, दुसरीकडे शहरातील विविध भागांत दोघांनी गळफास घेतला तर एकाने विषप्राशन करीत मृत्युला कवटाळल्याच्या घटना घडल्या. यात एका 28 वर्षीय युवकाचाही समावेश आहे. 

शहरातील मानसोपचार तज्ज्ञ संघटना, आयएमए आणि जिल्हा रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (ता.10) जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा केला. वाढत्या आत्महत्त्यांना प्रतिबंध करण्यासाठी रॅली काढून समाजाला संदेशही देण्यात आला. असे असताना शहरात दुसरीकडे तिघांनी आत्महत्त्या केल्याच्या घटना घडल्या. 
सामनगाव येथील जयप्रकाशनगरमधील युवकाने राहत्या घरात गळफास घेत आत्महत्त्या केली. अनिल राजेंद्र जाधव (28, रा. जयप्रकाशनगर, सामनगाव, नाशिकरोड) असे युवकाचे नाव आहे. अनिल याने गुरुवारी (ता.10) राहत्या घरात साडीने गळफास घेत आत्महत्त्या केली होती. सदरची बाब सकाळी सात वाजता लक्षात आली. याप्रकरणी नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. तर, दुसऱ्या घटनेत वडाळागावातील राहत्या घरात वृद्धाने गळफास घेत आत्महत्त्या केली. शफी शहा (65, रा. सादीकनगर, वडाळागाव) असे नाव आहे. शफी शहा यांनी गुरुवारी (ता.10) राहत्या घरात कधीतरी नायलॉन दोरीने गळफास लावून घेत आत्महत्त्या केली. सदरची बाब सकाळी मुलगा मोहम्मद शफी शहा यांच्या लक्षात आल्यानंतर पोलिसांना खबर देण्यात आली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 
तर, तिसऱ्या घटनेत एकलहरा रोडवरील मार्केट यार्डमध्ये इसमाने विषारी औषध सेवन करीत आत्महत्त्या केली. पंडित गणपत भोर (50, रा. सामनगाव रोड, भोरमळा, नाशिकरोड) असे मयत इसमाचे नाव आहे. भोर यांनी गुरुवारी (ता.10) विषारी औषध सेवन केल्याने ते एकलहरा रोडवरील भाजीपाला मार्केट यार्डात मयत अवस्थेत आढळून आले होते. कैलास दळवी यांनी दिलेल्या खबरीनुसार नाशिकरोड पोलिसात नोंद करण्यात आली आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT