Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

जिल्हा परिषदेच्या शाळेत नोकरीचे आमिष दाखवून गंडा 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून एका संशयिताने मित्रालाच 11 लाख रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी उपनगर पोलीसात संशयित नितीन आनंद मेढे (रा. गौरकुंज निवास, अभियंतानगर, कामटवाडा, नाशिक) याच्याविरोधात फसवणूकीची गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मधुसुदन राधाकृष्ण बैरागी (रा. वडनेरदुमाला) यांच्या फिर्यादीनुसार, त्यांचा दूध विक्रीचा व्यवसाय आहे तर, त्यांची पत्नी खासगी शिकवणी घेते. वडनेर गेट येथे दूधविक्री करीत असताना, त्यांचा महाविद्यालयीन मित्र संशयित नितीन मेढे याची 2018 मध्ये भेट झाली. महाविद्यालयीन ओळख असल्याने त्यांच्या वारंवार भेटीगाठी होत राहिल्या. या दरम्यान संशयित नितीन याने श्री. बैरागी यांच्याकडे चौकशी करताना त्यांच्या पत्नी शिकवणी घेतात हे समजले. त्यावरून त्याने बैरागी यांच्या पत्नीला जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये शिक्षिका म्हणून नोकरी लावून देतो असे सांगितले. साहेब चांगल्या ओळखीचे असून त्यांचे मंत्रालयात येणे-जाणे असल्याने त्यांच्यामार्फत नोकरी मिळेल असे आमिष दाखवून संशयित नितीन याने बैरागी यांना विश्‍वासात घेत, त्यासाठी पैसे द्यावे लागतील असेही सांगितले. नोकरीच्या आशेपोटी डिसेंबर 2018 पासून श्री. बैरागी यांनी संशयित नितीनला वेळोवेळी 11 लाख 15 हजार रुपये दिले. तसेच, नोकरी मिळत नसल्याने बैरागी यांनी नितीनला जाब विचारला असता, त्याने टाळाटाळ केली. शिक्षक भरतीमध्ये तुमच्या पत्नीचे नाव लागेल असे सांगत संशयिताने चालढकल केली. मात्र त्यातही पत्नीचे नाव न आल्याने फसवणूक झाल्याचे लक्षात येताच श्री. बैरागी यांनी नितीनकडे पैशांची मागणी केली असता, त्याने पैसे देण्यासही टाळाटाळ केली. त्यामुळे याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

मतदानाच्या दिवशी सुप्रिया सुळे का पोहचल्या अजित पवारांच्या निवासस्थानी? भेटीमागे नेमकं काय दडलंय?

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : महाराष्ट्रात 11 वाजेपर्यंत 18.18 टक्के मतदान; बारामतीमध्ये सर्वात कमी मतदानाची नोंद

Lok Sabha 2024: बारामतीत मोठा घोळ! बँकांचं पासबुक ओळखपत्र म्हणून न स्विकारण्याच्या सूचना; काय आहे प्रकरण?

EVM वर कमळाचं फुलं दिसत नसल्याने आजोबा संतापले...बारामती मतदारसंघात नेमकं काय घडलं?

SCROLL FOR NEXT