Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

शहरात वाहनचोरीचे सत्र सुरूच 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : शहर पोलीस आयुक्तालयाच्या हददीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये कार-दुचाक्‍या चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. दररोज दोन-चार वाहने चोरीला गेल्याचे गुन्हे दाखल होता आहेत. त्यामुळे पोलिसांची नाकाबंदी आणि रात्रीच्या गस्ती फोल ठरल्याच्या चर्चा सुरू असतानाच, चोरटे पोलिसांना भारी ठरत असल्याचीही उपहासात्मक टीका त्रस्त नागरिक करीत आहेत. 
योगेश गुरुनाथ गोनल (रा. श्रीदत्त कॉलनी, शाहुनगर, गोडोली, सातारा. हल्ली रा. भोसला मिलिटरी स्कुल वस्तीगृह, नाशिक) या युवकाच्या फिर्यादीनुसार, गेल्या शनिवारी (ता.24) मध्यरात्रीच्या सुमारास वस्तीगृहाच्या पार्किंगमध्ये पार्क केलेली त्याच्या मित्राच्या नावे असलेली केटीएम दुचाकी (एमएच 15 जीपी 4603) अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे. याप्रकरणी गंगापूर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जुबेर जमीलखान पठाण (रा. स्नेहबंधन पार्क, पोलीस मुख्यालय, नाशिक) या युवकाच्या फिर्यादीनुसार, त्यांची 30 हजार रुपये किमतीची पॅशन दुचाकी (एमएच 15 डीडब्ल्यु 8748) गेल्या 13 तारखेला फाळके स्मारकाच्या प्रवेशदवारावर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने ती दुचाकी चोरून नेली. याप्रकरणी इंदिरानगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जितेंद्र जनार्दन गायकवाड (रा. अरिंगळे मळा, एकलहरा रोड, नाशिकरोड) यांची सीडी डिलक्‍स दुचाकी (एमएच 15 सीएच 1322) गेल्या 13 फेब्रुवारी रोजी रात्री आठ वाजेच्या सुमारास नाशिकरोडच्या उड्डाणपुलाखालून चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
दरम्यान, शहर पोलिसांकडून ठिकठिकाणी नाकाबंदी करीत वाहनांची तपासणी केली जात असतानाही गेल्या काही दिवसांमध्ये वाहनचोरीच्या घटनांचा आलेख वाढला आहे. तसेच, रात्रीची गस्तीही वाढविल्याचा दावा पोलिसांकडून केला जात असतानाही वाहनचोरी, चोऱ्या, घरफोड्या, हाणामारीच्या घटना घडत असल्याने त्रस्त नागरिकांकडून रोष व्यक्त होतो आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs MI : मुंबई पॉवर प्लेमध्ये 'पॉवर'लेस; लखनौनं प्ले ऑफचं गणित बिघडवलं?

Modi Latur Rally: "देवानं मला असं मॅन्युफॅक्चर केलंय की..."; PM मोदींनी सांगितलं आपण मोठाच विचार का करतो

Hardik Pandya LSG vs MI : भारतीय संघातील स्थान सेफ होताच हार्दिकचा भोपळा; मुंबईचा संघ आला अडचणीत

Shivam Dube: 'युवराजबरोबर तुलना मुर्खपणाचे...', टी20 वर्ल्ड कपसाठी निवड झालेला शिवम दुबे काय म्हणाला

Loksabha election 2024 : ''जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मुस्लिमांना एससी, एसटी अन् ओबीसीतून आरक्षण मिळू देणार नाही'' मोदींचा काँग्रेसवर हल्ला

SCROLL FOR NEXT