live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

शहरभर पोलिसांकडून कोम्बिंग ऑपरेशन 

सकाळ वृत्तसेवा

92 सराईत गुन्हेगारांची धरपकड : आंदोलकांवर करडी नजर 

नाशिक : येत्या आठवड्यात नाशिकमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर नाशिक शहर पोलिसांनी शहरात शनिवारी (ता.14) मध्यरात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवित रेकॉर्डवरील 92 गुन्हेगारांची धरपकड केली. दरम्यान, शहरात कडेकोट पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला असून गस्ती पथकाकडून शहरात दाखल होणाऱ्या प्रत्येक वाहनांची कसून तपासणी केली जात आहे. 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची येत्या बुधवारी (ता.18) सायंकाळी शहरात महाजनादेश यात्रेनिमित्ताने रोड शो आहे. तर, गुरुवारी (ता.19) सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आहे. त्यापार्श्‍वभूमीवर पोलीस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (ता.14) रात्री शहरात ऑनआऊट व कोमिंबग ऑपरेशन राबविण्यात आले. रात्री 11 वाजता ऑपरेशनला सुरूवात करण्यात येऊन पहाटे 2 वाजेपर्यंत सुरू होते. यादरम्यान, आयुक्तालय हद्दीतील पोलीस ठाणेनिहाय रेकॉर्डवरील गुन्हेगारांच्या घरी जाऊन पोलिसांनी 92 गुन्हेगारांची धरपकड केली. 
शहरातील नांदुरनाका, सिन्नरफाटा, म्हसरूळगाव, राऊ हॉटेल, अंबड टी पॉइंट, मालेगाव स्टॅण्ड, त्रिकोणी गार्डन, जेहान सर्कल, नारायणबापू नगर, पाथर्डी फाटा, संसरी नाका, फुलेनगर, पंचवटी, वाघाडी, मल्हारखाण झोपडपट्टी, सातपूर गाव या ठिकाणी रात्रभर पोलिसांनी गुन्हेगारांची शोध मोहिमेची कारवाई केली. रेकॉर्डवरील गुन्हेगार, नाकाबंदी, ड्रंक ऍण्ड ड्राइव्ह, तडीपार तपासणी, हॉटेल, लॉजेस तपासण्यात आले. यावेळी शहराच्या सीमावर्ती भागात नाकाबंदी करण्यात आली. रेकॉर्डवरील 127 पैकी 92 गुन्हेगार मिळून आले असता, त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई केली. 91 हॉटेल्स व ढाब्याची तपासणी करीत 63 जणांविरुद्ध मुंबई पोलिस ऍक्‍टनुसार कारवाई केली. नाकाबंदीमध्ये 540 वाहनांची तपासणी करण्यात येऊन 92 वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई करीत, 17 हजार 800 रुपयांचा दंड वसुल केला. तसेच, शहर हद्दीमध्ये ठिकठिकाणी केलेल्या कारवाईत 105 टवाळखोरांवर पोलिसांनी कारवाई केली. 

संघटनांवर करडी नजर 
मुख्यमंत्र्यांच्या महाजनादेश यात्रेदरम्यान काही संघटनांकडून आंदोलनाची शक्‍यता आहे. त्यामुळे पोलिसांकडून अशा काही संघटनांच्या हालचालींवर बारकाईने नजर ठेवून आहेत. तसेच, काही पदाधिकाऱ्यांना नोटिसा बजाविल्या जाण्याचीही शक्‍यता आहे. तर काहींना नजर कैद होण्याचीही शक्‍यता नाकारता येत नाही. तर गुन्हेगारांविरोधातील कोम्बिंग ऑपरेशनची मोहिम आणखी दोन-तीन दिवस सातत्याने राबविली जाणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

'शरद पवारांनी भाजपला पाठिंबा दिला होता, ती जर सुपारी होती तर आमचीही..'; आव्हाड, राऊतांच्या टीकेला मनसे आमदाराचं प्रत्युत्तर

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE : मुंब्य्रातील बाबाजी पाटील विद्यालयात मतदान सुरूच

Lok Sabha Election 2024 : मतदान केंद्रावरील निवडणूक आयोगाने दिलेल्या सुविधांचा मतदारांना दिलासा

Latest Marathi Live News Update : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जोरदार पाऊस, शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान

Devendra Fadanvis: 'उद्धव ठाकरेंचं रडगाणं सुरू, पराभव समोर दिसू लागल्यानेच त्यांची मोदींवर टीका'; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

SCROLL FOR NEXT