live photo
live photo 
उत्तर महाराष्ट्र

महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीत वाहतूक नियमांची एैसी-तैसी 

सकाळ वृत्तसेवा

ना हेल्मेट, ट्रिपलसीट, धावत्या दुचाकीवरून सेल्फी-फेसबुक लाईव्ह करीत नियम पायदळी 


नाशिक : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये आज शहरातून निघालेल्या महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीमध्ये सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांनी वाहतूकीचे नियम अक्षरश: पायदळी तुडविले. तेही गृहमंत्री ही अतिरिक्त जबाबदारी सांभाळणाऱ्या मुख्यमंत्री, पोलीसांच्या डोळ्यासमोर घडले. एरवी, विनाहेल्मेट वा ट्रिपलसीट दुचाकीस्वारांना वाहतूक पोलीसांकडून कडाक्‍याच्या वादावादीनंतर चालन भरण्यास भाग पाडणाऱ्या पोलिसांकडून महाजनादेश यात्रेच्या बाईक रॅलीत सहभागी झालेल्या दुचाकीस्वारांना विनाहेल्मेटची वा वाहतुकीचे नियम पायदळी तुडविण्याची परवानगी दिली होती काय, असा संतप्त सवाल जागरुक नागरिकांकडून केला जात आहे.

वाढते अपघात आणि त्यात बळी जाणाऱ्यांमुळे केंद्रशासनापासून ते वाहतूक पोलिसांपर्यंत साऱ्यांनाच काळजी लागून राहिली आहे. त्यामुळेच केंद्र शासनाने नवीन मोटारवाहन कायदा अंमलात आणला असला तरी अद्याप महाराष्ट्रात लागू करण्यात आलेला नाही. यात दुप्पट दंडाची वाढ करण्यात आल्याने निवडणुकीच्या तोंडावर वाहनचालकांचा रोष वाढण्याची शक्‍यता आहे. तरीही वाहतूक पोलिसांकडून विनाहेल्मेट-सीटबेल्टसाठी 500 रुपये दंड आकारला जातो. त्यासाठी पोलिसांकडून दररोज वाहतूक सिग्नल आणि ठिकठिकाणी नाकाबंदी करीत कारवाई करीत दंडाचे चालन फाडले जाते.
मात्र, आज वाहतूक पोलीसच नव्हे तर राज्यभरातून महाजनादेश यात्रेच्या बंदोबस्तासाठी आलेल्या पोलिसांसमोर वाहतूक नियम यात्रेतील सहभागी बाईक रॅलीतील दुचाकीस्वारांनी तुडविले. एकाही बाईकस्वाराकडे हेल्मेट नव्हते. उलट एकेका बाईकवर तिघेजण बसून रॅलीत दुचाकी चालविली जात होती. तर काही दुचाक्‍यांचे सायलेंसर काढून कर्णकर्कश आवाजाने ध्वनीप्रदूषण होत होते. परंतु त्याकडे पोलिसांकडून सोयीस्कर दूर्लक्ष केले गेले. एवढेच नव्हे तर, धावत्या बाईकवर उभे राहत काही तरुणांकडून सेल्फी काढला जात होता. काही तरुण या बाईक रॅलीचे फेसबुक लाईव्हही करीत होते. मात्र पोलिसांनी कोणावरही दंडात्मक कारवाई केली नाही, हे विशेष.
...
वाहतूक कोंडीने मनस्ताप
तब्बल दोन तास उशिराने सुरू झालेल्या महाजनादेश यात्रेचा सिडको, सातपूरातील चाकरमान्यांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. पाथर्डी फाटा येथून यात्रा सायंकाळी 5 वाजता सुरू झाली. त्याचवेळी अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीतील कामगारांची सुट्टी झाली. शाळा सुटल्या. परंतु, यात्रेमुळे ठिकठिकाणी बॅरिकेटिंग करीत पोलिसांनी वाहतूक रोखली होती. त्यामुळे दोन तासापेक्षाही अधिक काळ चाकरमाने, विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. त्रिमूर्ती चौक, सिटी सेंटर मॉल, संभाजी चौक, शरणपूर चौकी सिग्नल याठिकाणी लांबच्या लांब रांगा लागल्या होत्या. पर्यायी रस्त्यावरही वाहनांची कोंडी झाली होती. त्र्यंबकरोडवरील सिबल हॉटेल्स सिग्नल येथेही वाहतुकीची कोंडी झाली. त्यावेळी माजी आमदार नितीन भोसले यांनी चौकात उभे राहत वाहतूक कोंडी सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. वाहतूक पोलिस यात्रा निघून गेल्यानंतर गायब झाल्याने वाहतुकीचा खोळंबा झाला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

KKR vs DC : दिल्ली पॉईंट टेबलमध्ये मोठी उसळी घेणार की जेक फ्रेसर मॅर्कगर्कला केकेआर रोखणार?

CSK vs SRH IPL 2024 : चेन्नईनं पुन्हा जिंकला चेपॉकचा गड; हैदराबादची इतिहासातील सर्वात मोठी हार

Sambhajinagar : राज्यातील पहिल्या मोसंबी ग्रेडींग व्हॅक्सीन व कोल्ड स्टोरेज केंद्राचे काम पूर्णत्वाकडे

Share Market : शेअर बाजारातील किरकोळ गुंतवणूकदारांच्या संखेत वर्षात ४.०३ कोटींची वाढ; देशात 'हे' राज्य आघाडीवर

Pune Traffic Updates : पुणे विद्यापीठ चौकातील मेट्रोच्या कामानिमित्त वाहतुकीत बदल

SCROLL FOR NEXT