Residential photo
Residential photo 
उत्तर महाराष्ट्र

तिसऱ्या श्रावण फेरीसाठी कडेकोट बंदोबस्त 

सकाळ वृत्तसेवा

नाशिक : बारा ज्योर्तिलिंगापैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्‍वर येथे तिसऱ्या श्रावण सोमवारच्या ब्रह्मगिरी फेरीसाठी "बम बम भोले'च्या गजरात भाविकांनी कूच केले. लाखोंच्या संख्येने सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी पोलीसांकडून कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. खासगी वाहनांना खंबाळे फाट्यापर्यंतच जाता येणार आहे. तर नाशिकमधून राज्य परिवहन महामंडळाच्या भाविकांसाठी बसेसच्या फेऱ्या ठेवण्यात आल्या आहेत. दरम्यान, तिसऱ्या श्रावणी सोमवारनिमित्ताने गोदाघाटावरील कपालेश्‍वर मंदिरातही उद्या (ता.19) भाविकांची गर्दी होणार आहे. त्यासाठी या परिसरातील मार्ग वाहतूकीसाठी बंद करण्यात आले आहेत. 

त्र्यंबकेश्‍वर येथे श्रावण महिन्यातील तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी फेरी करण्याची पारंपरिक प्रथा आहे. या फेरीसाठी शहरातूनच नव्हे तर राज्य-परराज्यातून भाविक दाखल होतात. त्यासाठी रविवारी (ता.18) दुपारपासूनच भाविकांची रेलचेल नाशिकमध्ये वाढली आणि त्र्यंबकेश्‍वरकडे जाण्यासाठी इदगाह मैदानावर केलेल्या त्र्यंबक फेरीसाठीच्या बसेसमधून भाविक रवाना होऊ लागले. सायंकाळनंतर तर भाविकांची गर्दी वाढू लागली. दरम्यान दरवर्षापेक्षा मात्र यंदा भाविकांची संख्या रोडावल्याचे चित्र पाहावयास मिळाले. 
दरम्यान, नाशिक ग्रामीण पोलीस दलातर्फे त्र्यंबकेश्‍वर हद्दीमध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांच्या नेतृत्वाखाली अपर पोलीस अधीक्षक शर्मिष्ठा वालावलकर, दोन उपअधीक्षक, त्र्यंबकेश्‍वर पोलीस आणि जिल्हा वाहतूक शाखा असा कडेकोट पोलीस बंदोबस्त आहे. खासगी वाहनांना सायंकाळनंतर शहरात प्रवेशबंदी केली गेली. तर, खंबाळे, आंबोली, पहिने याठिकाणी खासगी वाहनांसाठी पार्किंग आहे. तर जव्हार फाट्यापर्यंत राज्य परिवहन महामंडळाच्या बसेसचा पर्याय भाविकांसमोर होता. "बम बम भोले'च्या गजरात भाविक बसमधून ब्रह्मगिरी फेरीसाठी रवाना होत होते. 

शहरात कडेकोट बंदोबस्त; तरीही वाहतूक कोंडी 
त्र्यंबकेश्‍वरकडे जाणाऱ्या भाविकांसाठी त्र्यंबक नाक्‍यावरील इदगाह मैदान येथे बसेसचे नियोजन केले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेत शहर वाहतूक शाखा आणि सरकारवाडा पोलिस ठाण्यामार्फत बंदोबस्त तैनात होता. तरीही ठक्‍कर बाजार ते मेळा बसस्थानक या मार्गावर तासन्‌तास वाहतुकीची कोंडी होत होती. तर गस्तीवर असलेली वाहतूक शाखेचे पोलीस कोंडी सोडविण्याऐवजी वाहने पार्क करून गप्पाटप्पा मारण्यात मश्‍गुल होते. यासंदर्भात नियंत्रण कक्षाकडे काही तक्रारदारांनी संपर्क साधून कोंडीची माहिती दिली असता, नियंत्रण कक्षाकडून वाहतूक शाखेशी संपर्क साधा असा उलटा निरोप दिला जात होता. परंतु यात दिवसभर कोंडीची समस्या मात्र सुटली नाही. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 LSG vs RR : केएल शेर तर संजू सवा शेर! राजस्थानचा एक पाय प्ले ऑफमध्ये

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

SCROLL FOR NEXT