Satana Corporations Wells Work Should Complete immediately Says Rahul Patil
Satana Corporations Wells Work Should Complete immediately Says Rahul Patil 
उत्तर महाराष्ट्र

सटाणा पालिकेच्या विंधन विहिरीचे काम तात्काळ पूर्ण करा; पाणीपुरवठा सभापतींचा आदेश

सकाळवृत्तसेवा

सटाणा - सटाणा शहराचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी नगराध्यक्ष व सर्व नगरसेवक वचनबद्ध असून नागरिकांचे सहकार्य अपेक्षित आहे. शहरवासियांना पाणीटंचाईची झळ बसू नये यासाठी ठेंगोडा (ता. बागलाण) येथील गिरणा नदीपात्रालगत पालिकेतर्फे नव्याने विंधन विहीर बांधण्याचे काम सुरु आहे. या विंधन विहिरीचे काम तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित ठेकेदाराला दिले आहेत, अशी माहिती पालिकेचे पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांनी दिली.  

पालिकेतर्फे गिरणा नदीपात्रालगत नव्याने बांधण्यात येणाऱ्या विंधन विहीरीची पाहणी करण्यासाठी पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील व नगराध्यक्ष सुनील मोरे यांच्यासह सर्व नगरसेवकांनी ठेंगोडा येथे भेट दिली. शहराच्या सुरळीत पाणीपुरवठ्यासाठी सुरु असलेल्या उपाययोजनांचा एक भाग म्हणून पाणीपुरवठा सभापती राहुल पाटील यांच्या पाठपुराव्यातून सर्व नगरसेवकांसह या विंधन विहिरीची पाहणी केली. टंचाईकाळात अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सतर्कतेने काम करून जवळपास 75 टक्के काम पूर्ण झालेल्या विंधनविहिरीचे काम युद्धपातळीवर पूर्ण करण्याचे आदेशही श्री.पाटील यांनी यावेळी दिले. यावेळी नगराध्यक्ष मोरे, उपनगराध्यक्षा सुवर्णा नंदाळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते काकाजी सोनवणे, काँग्रेसचे गटनेते दिनकर सोनवणे, नगरसेविका सोनाली बैताडे, संगीता देवरे, पुष्पा सूर्यवंशी, सुनिता मोरकर, निर्मला भदाणे, शमा मन्सुरी, भारती सूर्यवंशी, शमीम मुल्ला, नगरसेवक दीपक पाकळे, मनोहर देवरे, बाळू बागुल, महेश देवरे, दत्तू बैताडे, नाना मोरकर, दीपक नंदाळे यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख श्रीकांत फागणेकर, संजय सोनवणे आदी उपस्थित होते.

'सध्या कडक उन्हाळा असून मार्च महिन्यातच सर्व विहिरींनी तळ गाठल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे सर्वाना पाणीटंचाईचा सामना करावा लागत असून सटाणा नगरपरिषद देखील याला अपवाद नाही. मात्र जिल्ह्यातील इतर पालिकांच्या तुलनेत सटाणा पालिकेच्या पाणीपुरवठ्याचे नियोजन अधिक चांगले आहे. सटाणा शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी पालिका प्रशासन व लोकप्रतिनिधी प्रयत्नशील असून शहरवासियांनी टंचाईकाळात पाणी जपून वापरावे आणि पालिकेस सहकार्य करावे,' असे मत पाणीपुरवठा समितीचे सभापती राहुल पाटील यांनी मांडले.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

RBI: मोदी सरकार बायबॅक करणार 40 हजार कोटींचे सोवेरियन बाँड, आरबीआयची माहिती; गुंतवणूकदारांचे काय होणार?

"माझी लाडकी जिवंत आहे", आई 3 दिवस मुलीच्या मृतदेहासोबत झोपली! पोलीस आले अन्...

Latest Marathi News Live Update : भाजप देशात २०० पार करणार नाही- आदित्य ठाकरे

Government Apps : आता बनावट अ‍ॅप्सवरुन होणारी फसवणूक टळणार! सरकारी अ‍ॅप्ससाठी गुगल प्ले स्टोअरने घेतला मोठा निर्णय..

SCROLL FOR NEXT