farmer suiside.jpg
farmer suiside.jpg 
उत्तर महाराष्ट्र

यामुळे शिंगवेच्या शेतक-याने केली आत्महत्या 

संजय भागवत: सकाळ वृत्तसेवा

निफाड : शिंगवे येथील युवा शेतकरी सोमनाथ बाळकृष्ण डेर्ले (वय ४८) यांनी पुरामुळे झालेले पिकांचे नुकसानीने तसेच एका साखर कारखान्याला दिलेल्या ऊसाचे पैसे प्रलंबित असल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.आर्थिक तंगीने हताश होत सोमवार (ता.७) गळफास घेऊन जीवन यात्रा संपवली. संध्याकाळी शिंगवे स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अतिशय मितभाषी असलेल्या सोमनाथ डेर्ले यांच्या आत्महत्येने गावात शोककळा पसरली.

ऑगस्टमध्ये गोदावरी नदीला महापूर आला होता. महापुरात ऊस व शेती पिकांचे मोठे नुकसान झाले. आर्थिक नुकसान झाल्याने सोमनाथ डेर्ले हताश झाले.अशातच त्यांनी एका स्थानिक साखर कारखान्याला ऊस गाळपासाठी दिला होता. अनेक महिने उलटूनही ऊसाचे पैसे मिळाले नाही. त्यामुळे ते आर्थिक संकटात सापडले होते. त्यांना एक मुलगा एक मुलगी आहे. त्यांचेही उच्च  शिक्षण सुरू आहे. शिक्षणासाठी पैसा आणायचा कुठून? या तणावात ते होते. तसेच द्राक्ष बागेची छाटणी करायची होती त्यासाठी ही पैशाची गरज होती. तसेच कुटुंबासाठीही पैशाची आवश्यकता असताना आर्थिक तंगीमुळे ते हताश झाले. शेतातील पिक गेलं. ऊसाचे पेमेंट मिळालं नाही. पुढील पिकांसाठी भांडवल उभं करायचं कसं?असा प्रश्न त्यांना सतावत होता. त्या तणावातच त्यांनी काल (ता.७) अखेर घराजवळ गळफास घेवून आत्महत्या केली. असे त्यांच्या कुटुंबियांनी सकाळशी बोलतांना सांगितले. 

त्यांच्या मागे आई,वडील,पत्नी,एक मुलगा, एक मुलगी दोन भाऊ असा परिवार आहे. सायखेडा पोलिस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली. सहाय्यक पोलिस निरीक्षक आढसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस कर्मचारी हगवणे अधिक तपास करत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harsh Goenka: हर्षद मेहता युग परत आले? शेअरच्या किमतीत होतेय फेरफार; हर्ष गोयंका यांची अर्थ मंत्रालयाकडे तक्रार

KKR IPL 2024 : KKR जिंकणार यंदाची IPL ची ट्रॉफी? जसं 2012 मध्ये झालं तसंच 2024 मध्ये होतय....

CBSE Board : दहावीमध्ये मुलभूत गणित शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना आता ११ वीमध्ये स्टॅंडर्ड मॅथ्स हा विषय घेता येणार

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: मनसे अध्यक्ष राज ठाकरे सिंधुदुर्गात दाखल

SCROLL FOR NEXT