sachin-tendulkar
sachin-tendulkar 
उत्तर महाराष्ट्र

श्रीकांतचा येवल्याच्या फेटा मास्टर ब्लास्टरच्या डोक्यात बसतो तेव्हा

संतोष विंचू

येवला - क्रिकेटच्या देवाचा अकस्मातपणे फोन यावा अन त्यांनं म्हणावं की, श्रीकांत मला तुला भेटायचं आहे, मुंबईला बंगल्यावर ये...! हे वाक्यच जणू काही आयुष्याचं सोनं झाल्याचा साक्षात्कार देणार आहे. याचा अनुभव येथील फेटा कलाकार श्रीकांत खंदारे यांनी घेतला अन् मास्टर ब्लास्टरची तासापेक्षा अधिक वेळेच्या भेटीसह आस्थेने केलेल्या विचार पुसिने अक्षरक्षा भारावून गेला. किंबहुना जे स्वप्न पाहिले ते काही वर्षानंतर प्रत्यक्षात उतरल्याने जणू आकाश ठेंगणे झाले.

व्हीआयपिंची भेट म्हणजे केवळ दिवास्वप्नच...मात्र ओळखपाळख नसतांना फक्त एक चाहता आपल्या भेटीसाठी आसुसलेला आहे. हे समजताच त्याला स्वत बोलवून घेत सचिनने माणुसकीचा षटकारच ठोकला असे म्हणायला हरकत नाही. दिसायला देखणा पण स्वभावाने अगदी हळवा आणि भोळा असलेला श्रीकांत म्हणजे येवल्यातील अस्सल मराठमोळ्या फेट्याला थेट दिल्ली मुंबईपर्यंत ओळख करून देणारा अवलिया ठरला आहे. महिन्यापूर्वीच त्याने दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन त्यांनाही फेटा बांधला होता. अनेक सिनेकलाकार व क्रिकेटपटूंना फेटा बांधलेल्या श्रीकांतने मात्र मागील सात आठ वर्षांपासून सचिनला भेटून फेटा बांधावा ही एक मनोमन स्वप्न बाळगले होते. अखेर या स्वप्नांच्या मागे धावता धावता ते प्रत्यक्षात साकारले गेले आहे. महाराष्ट्राची शान असलेला फेटा बांधण्याची कलेच्या जोरावर आजपर्यंत अनेकाना फेटा बांधून आपली स्वप्नपूर्ती प्रत्यक्षात उतरवणारा अवलिया श्रीकांत याने मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचे निवासस्थानी आपल्या कुटुंबियांसह जाऊन त्यांना फेटा बांधून आपल्या बकेट लिस्ट मधील आणखी एक स्वप्न पूर्ण केले.

खंदारे याच्या फेट्याची कलाकुसरी काही महिन्यांपूर्वी सचिन तेंडूलकर यांचे मोठे बंधू नितीन तेंडूलकर, सौ.मीना तेंडूलकर यांनी येथे कार्यक्रमानिमित्त आल्यावर पाहिली होती. त्यांना श्रीकांत याचे फेट्याचे सादरीकरण व डिझाईन खूप आवडले. श्रीकांत हा सचिनचा खूप मोठा चाहता आहे व सचिनला भेटण्याची त्याला खूप इच्छा असल्याचे यावेळी तेंडुलकर कुटुंबियांना जाणवले होते. केवळ नित्सिम भक्त असलेल्या श्रीकांतला भेटण्याची सूचना भावाने केली अन अखेर तो दिवस आला...

सचिनने लागलीच मनाचा मोठेपणा दाखवत श्रीकांतला फोन करून भेटण्याचे निमंत्रण दिले. हा फोन आल्यावर श्रीकांतचा आनंद गगनात मावेनासा झाला किंबहुना स्वतला चिमटा काढत हे स्वप्न तर नाही ना याची त्याला खात्री करण्याची आनंदी वेळ आली होती. हे निमंत्रण स्विकारुन श्रीकांत बहीण सारिका, बंधू सुरेश, वाहिनी चित्रा यांचे समवेत तेंडुलकर यांच्या मुंबई येथील बंगल्यावर गेले. त्यावेळी सचिनची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यास फेटा बांधला, त्याचे बहिणीने सचिनचे औक्षण केले.यावेळी श्रीकांत याने सचिनच्या अवघा जीवनपटातील फोटोचे प्रदर्शन रुपात मांडला. हे प्रदर्शन पाहून हे फोटो अतिशय दुर्मिळ असून ते माझ्याकडे देखील नसल्याचे सांगून श्रीकांतचे कौतुक केले.श्रीकांतने सचिनला येवल्याला येण्याचे दिलेले निमंत्रण त्याने स्वीकारून लवकर येवल्याला येणार असल्याचे आश्वासन दिले.

“शब्दात वर्णन करू शकणार नाही असा हा क्षण माझ्या आयुष्यात मी अनुभवला आहे.ज्या व्यक्तीला एखादा व्हीआयपी भेटू शकणार नाही त्या क्रिकेटच्या देवाने मला बोलवून घ्यावे म्हणजे अतर्कच..तब्बल तासापेक्षा जास्त वेळ देऊन त्याने मारलेल्या गप्पा व केलेले आमच्या कुटुंबाचे कौतुक आयुष्यभर पुरेल अशी शिदोरी आहे, ”
श्रीकांत खंदारे, फेटा कलाकार, येवला

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT