Social messaging by students in Dhule
Social messaging by students in Dhule 
उत्तर महाराष्ट्र

विद्यार्थ्यांचा पथनाट्याद्वारे सामाजिक संदेश

सकाळ वृत्तसेवा

धुळेः नेताजी सुभाषचंद्र बोस यांची 123 वी जयंती व जयहिंद शैक्षणिक संस्था स्थापना दिनानिमित्त आज संस्थेतर्फे शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली. जुने धुळ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शोभायात्रेतून विविध सांस्कृतिक कार्यक्रम, पथनाट्यांतून सामाजिक संदेश दिले. ते शहरवासीयांचे आकर्षण ठरले.

येथील जयहिंद शैक्षणिक संस्थेच्या सर्व शाळांनी एकत्रित येत जयहिंद हायस्कूल, जयहिंद चौक, सुधा हॉस्पिटल, स्वातंत्र्यवीर सावरकर पुतळा, लहान पुलावरून राणाप्रताप चौक, फुलवाला चौक, गल्ली क्रमांक सहामार्गे जुने धुळ्यातील नेताजी सुभाषचंद्र बोस पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढली. तीत कुंभार गुरुजी मराठी शाळेच्या विद्यार्थ्यांनी नेताजी बोस, शिवाजी महाराज, डॉ. आंबेडकर, आदींची वेषभूषा धारण केली होती. जयहिंद हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी संयुक्त लेझीम, टिपरी नृत्य सादर केले. झेड. बी. पाटील महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी "फास्ट फूडला मारा गोळी' तसेच "मोबाईलचे व्यसन आयुष्याचे झाले बेसन', जयहिंद हायस्कूलच्या सायन्स क्ल बच्या विद्यार्थ्यांनी "प्लास्टिक बंदी', जयहिंद बालभवनच्या विद्यार्थ्यांनी "मोबाईलच्या अतिवापराचे दुष्परिणाम', राजे संभाजी हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी "मुलांच्या अतिलाडाचे दुष्परिणाम', "रस्ता सुरक्षा' आदी ज्वलंत विषयांवर पथनाट्ये सादर केली. ती शहरवासीयांसाठी आकर्षण ठरली.

जुने धुळ्यातील सुभाष चौकात आमदार डॉ. फारुक शाह, महापौर चंद्रकांत सोनार यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. जयहिंद संस्थेचे उपाध्यक्ष प्रमोद पाटील यांनी विद्यार्थ्यांनी व्यसनांपासून लांब राहावे, शरीरस्वास्थ्य जपावे तसेच अभ्यासाकडे अधिक लक्ष द्यावे, असे आवाहन केले.

प्रा. भाग्यश्री पाटील यांनी सूत्रसंचालन केले. जयहिंद संस्थेचे अध्यक्ष डॉ. अरुण साळुंके, उपाध्यक्ष प्रमोद पाटील, सचिव प्रदीप भदाणे, संचालक विजय पाटील, अजितराव मोरे, वसंतराव ईशी, चंद्रशेखर पाटील, शेखर सूर्यवंशी, डॉ. अनिल चौधरी, नाना कोर, राजेन पाटील, प्रतिभा चौधरी, स्मिता साळुंखे, प्रा. डॉ. नीलिमा पाटील, संस्थेतील विविध शाखांचे प्राचार्य, उपप्राचार्य, मुख्याध्यापक, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Accident News: मुंबई आग्रा चांदवड मार्गावर भीषण अपघात; ६ ते ७ जणांचा मृत्यू, अनेक जण जखमी

Covishield बनवणाऱ्या कंपनीने ब्रिटिश कोर्टात मान्य केले लसीचे दुष्परिणाम! कोणते साईड एफेक्ट्स होतात जाणून घ्या

Loksabha Election 2024 : शांतीगिरी महाराजांमुळे तिढा वाढला ; नाशिकमध्ये शिवसेनेकडून अर्ज सादर केल्याचा दावा

Share Market Opening: शेअर बाजाराची वाढीसह सुरुवात; निफ्टी बँक पुन्हा नवीन विक्रमी उच्चांकावर

Latest Marathi News Live Update : बाणेर-पाषाण रोडवर ट्रॅफिक जाम.. वाहनांच्या रांगा

SCROLL FOR NEXT