A special meeting for selecting sarpanch at Jaitane
A special meeting for selecting sarpanch at Jaitane 
उत्तर महाराष्ट्र

जैताणेत सरपंच निवडीसाठी विशेष सभा; ग्रामस्थांची उत्कंठा शिगेला!

प्रा. भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील जैताणे (ता. साक्री) येथील सर्वात मोठ्या सतरा सदस्यीय ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवड शुक्रवारी (ता. 28) दुपारी दोनला ग्रामपंचायत कार्यालयात होणार आहे. मावळते सरपंच संजय खैरनार यांनी ठरल्याप्रमाणे दि. 28 ऑगस्टला राजीनामा दिला होता. त्या पार्श्वभूमीवर दुपारी दोनला ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलाविण्यात आली आहे.

निजामपूर भागाचे मंडळाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी एस. एस. चित्ते यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी दोनला ही विशेष सभा बोलाविण्यात आली असून उभरांडीचे तलाठी युनूस सय्यद, निजामपूरचे तलाठी प्रशांत माळी, जैताणेचे तलाठी भूषण रोजेकर हे सहाय्यक म्हणून कामकाज पाहतील. तर जैताणे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी अनिल राठोड व वरिष्ठ लिपिक यादव भदाणे आदी त्यांना सहकार्य करतील. सकाळी 10 ते 12 वाजेदरम्यान सरपंचपदासाठी नामांकन अर्ज दाखल करणे व दुपारी 12 ते 2 वाजेदरम्यान माघारीची अंतिम मुदत आहे. त्यानंतर दुपारी दोन वाजता प्रत्यक्ष निवड प्रक्रियेला सुरुवात होईल.

सरपंच निवड जवळपास बिनविरोध!
धनगर समाजाचे ज्येष्ठ मार्गदर्शक, गटनेते व ग्रामपंचायत सदस्य यांचे आपापसात ठरल्यानुसार सरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य ईश्वर न्याहळदे यांची बिनविरोध निवड जवळपास निश्चित मानली जात असून ऐनवेळी नेमक्या काय घडामोडी घडतात? याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे. सरपंचपदाची 'पहिली टर्म' ईश्वर न्याहळदे यांना देण्याचे सर्वानुमते ठरले असून त्यांनतर धनगर समाजाच्या उर्वरित सदस्यांनाही ठराविक कालावधीसाठी सरपंचपदी संधी देण्याचे ठरले आहे. पुढील दोन वर्षे सरपंचपद धनगर समाजाला, तर उपसरपंचपद माळी समाजाला दिले जाणार आहे. सद्या सतरा पैकी पंधरा सदस्य 'नॉट रीचेबल' असल्याचे समजते.

उपसरपंचपदाबाबत उलटसुलट चर्चा!
उपसरपंचपदी ग्रामपंचायत सदस्य नवल खैरनार यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता आहे. परंतु माळी समाजाच्या काही सदस्यांनी त्यांच्या नावाला उघड विरोध केल्याने त्यांच्या बिनविरोध निवडीची शक्यता धूसर वाटते. आगामी काळात जैताणेच्या सरपंच-उपसरपंचपदी नेमकी कुणाची वर्णी लागते? याबाबत ग्रामस्थांची उत्कंठा शिगेला पोचली असून निजामपूर-जैताणेसह माळमाथा परिसरात कमालीची उत्सुकता आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT