onion stolen.jpg
onion stolen.jpg 
उत्तर महाराष्ट्र

आधी कांदा टाकून खाल्ली भेळ..नंतर त्याच कांद्याची चोरली ४० गोणी

प्रफुल्ल कुंवर : सकाळ वृत्तसेवा

नाशिक : अंतापूर (ता. बागलाण) रावेर शिवारात (ता.३) रात्री मुस्ताक शेख यांच्या कांद्याच्या चाळीतून साधारण १ लाख ३० हजार रुपये किमतीचा कांदा चोरीला गेल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत जायखेडा पोलीस ठाण्यामध्ये चोरीबाबत तक्रार दाखल झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक एस. के. पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येत आहे.

तर अशी घडली घटना...

मिळालेल्या माहितीनुसार ताहाराबाद- अंतापुर रस्त्यावरील रावेर शिवारातील गट नंबर २३ मधील रस्त्यालगत मुस्ताक शेख यांची कांद्याची चाळ आहे. (ता.३) रात्री अज्ञात चोरट्यांनी वाहन आणून सोबत आणलेला भत्ता कांद्याबरोबर खाऊन कांद्याच्या ६२ गोणींपैकी ४० गोणी आणलेल्या वाहनात टाकून पोबारा केला आहे. दुस-या दिवशी सकाळी लुकमान शेख शेतात आल्यानंतर त्यांना लोखंडी गेटचे साखळी, कुलूप तोडलेली दिसले. त्यावेळी त्यांच्या लक्षात आले असता त्यांनी जायखेडा पोलीस स्टेशनची संपर्क साधून साहेब पोलीस निरीक्षक पांढरे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार पी. एम. पवार यांनी मोहन महाजन, लुकमान शेख, अदनान शेख, भगवान माळी यांच्यासमक्ष पंचनामा केला.

गावात भितीचे वातावरण निर्माण

या अगोदर अंतापुर- मुल्हेर रस्त्यावरील आनंदा गवळी यांच्या गट क्र. ३४७ मध्ये उभे असलेल्या दोन ट्रॅक्टरच्या बॅटरी, संजय पानपाटील यांच्या २० शेळ्या, साहेबराव साताळे यांची एक मोटरसायकल, यांच्यासह अनेक शेती उपयोगी साहित्य, उत्पादने चोरी जात असल्याने भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच परतीच्या पावसामुळे झालेल्या पिकांचे नुकसान व रात्री-पहाटे होणाऱ्या चोऱ्यांमुळे दुष्काळात तेरावा महिना उभा राहीला आहे.  

पोलिस संख्याबळ कमी असल्याने गुन्ह्यांचे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले

जायखेडा  पोलीस स्टेशन अंतर्गत मोसम -करंजाडी खोऱ्यातील ९२ गाव आहेत. पोलिस संख्याबळ कमी असल्याने अशा लहान-मोठ्या गुन्ह्यांचे व चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहे . शासनाने  अधिक पोलीस बळ व  गस्त वाढऊन  आतापर्यंत झालेल्या चोऱ्याचा  तपास लावून कायदेशीर कारवाई करावी अशी मागणी  अंतापुर येथील  माजी उपसरपंच साहेबराव गवळी यांनी केली आहे.                      

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Onion Export: कांदा उत्पादकांना मोठा दिलासा! केंद्र सरकारची कांदा निर्यातीला परवानगी

IPL 2024 DC vs MI Live Score : मुंबईने जिंकली नाणेफेक! जाणून घ्या दोन्ही संघाची प्लेइंग ११

Mamata Banerjee: ममता बॅनर्जींचा पुन्हा अपघात! हेलिकॉप्टरमध्ये जाताना पाय निसटला अन्..; पाहा व्हिडिओ

'श..श...शशांक...', KKR विरुद्ध विजयानंतर पंजाबच्या पठ्ठ्यानं शाहरुखच्या स्टाईलमध्ये ईडन गार्डन्सचे मानले आभार, पाहा Video

Bank Crisis: मोठ्या आर्थिक संकटाची सुरुवात? अमेरिकेत आणखी एक बँक दिवाळखोर; काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT