dead body
dead body 
उत्तर महाराष्ट्र

शालेय विद्यार्थ्याचा दगडाखाली दाबला गेल्याने मृत्यू

भगवान जगदाळे

निजामपूर-जैताणे (धुळे) : माळमाथा परिसरातील खुडाणे (ता.साक्री) येथील जिल्हा परिषद शाळेत दुसरीत शिकणाऱ्या विजय भीमराव मोरे (वय-8) ह्या शालेय आदिवासी विद्यार्थ्याचा शेकडो किलो वजनाच्या मोठ्या दगडाखाली दाबला गेल्याने मृत्यू झाला. घरी लवकर माहिती न मिळाल्याने सायंकाळी शोधाशोध केल्यानंतर हा प्रकार निदर्शनास आला. मुलाचा मृतदेह पाहताच पालकांनी हंबरडा फोडला. नातेवाईकांसह ग्रामस्थही शोकमग्न झाले.

शनिवारी (ता.27) दुपारी जेवणानंतर विजय त्याच्या भावासमवेत येथील सार्वजनिक हायस्कूल जवळील टेकडीच्या आसपास फिरायला गेलेला होता. खेळता खेळता घोरपड शोधायच्या प्रयत्नात टेकडीवरील एका मोठ्या दगडाखाली दाबला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाल्याची चर्चा होती. सायंकाळी साडेपाच-सहाच्या दरम्यान घटनेची माहिती मिळाल्यानंतर ग्रामस्थांनी दोन ते तीन तासांच्या अथक प्रयत्नांनी जेसीबीच्या साह्याने त्याच्या अंगावरील विराट दगड बाजूला केला व मृतदेह बाहेर काढला. 

त्यानंतर रात्री उशिरा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी खाजगी वाहनाने जैताणे आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आला. तेथे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यास मृत घोषित केले. रात्री अकराच्या सुमारास विजयच्या नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार निजामपूर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली. सहाय्यक निरीक्षक सचिन शिरसाट व उपनिरीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार शिरसाठ घटनेचा पुढील तपास करीत आहेत. शवविच्छेदनानंतर सकाळी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. सकाळी दहा ते अकराच्या दरम्यान अंत्यत शोकाकुल वातावरणात विजयवर अंत्यसंस्कार झाले. विजयचे वडील भीमराव मोरे पत्नीसह मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवितात, अशी माहिती येथील सामाजिक कार्यकर्ते पराग माळी यांनी 'सकाळ'शी बोलताना दिली.!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: सेंड ऑफ देणाऱ्या KKRच्या खेळाडूलाच BCCI ने दिला सेंड ऑफ; दंडाचीच नाही, तर बंदीचीही झाली कारवाई

Aditya Thackeray : बाहेरचे लोक कोण आम्हाला येऊन सांगणारे? आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका

LSG vs MI IPL 2024 Live : मोहसीन खानने मुंबईला दिला तगडा झटका

तुम्हाला पत्रावळीवर जेवायची इच्छा झाली आणि तुम्ही वाटोळे करून घेतलं; जितेंद्र आव्हाड यांची मुख्यमंत्री शिंदेंवर टीका

Ulhasnagar News : उल्हासनगरातील बेवारस वाहने पालिकेच्या रडारवर; 11 वाहन मालकांकडून 17 हजाराचा दंड वसूल

SCROLL FOR NEXT