summoned to Sambhaji Bhide for appear before court
summoned to Sambhaji Bhide for appear before court 
उत्तर महाराष्ट्र

न्यायालयात हजर राहण्यासाठी संभाजी भिडेंना बजावले जाणार समन्स

सकाळवृत्तसेवा

नाशिक : शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष संभाजी भिडे यांना येत्या 28 सप्टेंबर रोजी जिल्हा न्यायालयात हजर राहण्यासाठी समन्स बजावले जाणार आहे. संभाजी भिडे यांना आज न्यायालयात हजर राहण्यासंदर्भात कळविण्यात आले असतानाही ते आज अनुपस्थित राहिले. 

संभाजी भिडे यांना नाशिक जिल्हा व सत्र न्यायालयात आज (ता.31) उपस्थित राहण्याचे आदेश होते. परंतु ते अनुपस्थित राहिले. त्यामुळे न्या. श्रीमती धांडे यांच्यासमोर सुनावणी झाली असता सरकारी पक्षातर्फे भिडे गुरुजी यांना समन्स बजावण्याचा युक्तिवाद करण्यात आला. त्यानुसार, न्यायालयाकडून त्यांना येत्या 28 सप्टेंबर रोजी राहण्यासाठीचा समन्स बजाविला जाणार आहे. 

संभाजी भिडे यांची नाशिकमध्ये गेल्या 10 जून रोजी सभा झाली होती. त्या सभेमध्ये भिडे यांनी "माझ्या शेतातील आंबे 180 जणांना खाण्यास दिले असता, त्यापैकी 150 जणांना मुले जन्माला आल्याचे वादग्रस्त विधान केले होते. या वादग्रस्त वक्तव्याविरोधात "लेक लाकडी अभियान'तर्फे आरोग्य विभागाच्या पुणे येथील अतिरिक्त संचालकाकडे तक्रार केली होती. त्यानुसार, नाशिक महापालिकेने जिल्हा न्यायालयात भिडेंविरोधात दावा दाखल केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोरोना लसीच्या सर्टिफिकेटवरुन PM मोदींचा फोटो काढला! आरोग्य मंत्रालयाने का घेतला निर्णय?

Vishal Patil: "विशाल पाटील भाजपची बी टीम," चंद्रहार पाटलांचा सनसणीत आरोप; प्रचाराच्या अंतिम टप्प्यात सांगलीचा पार चढणार

Johnson Baby Powder: जॉन्सन अँड जॉन्सन कर्करोगाचे खटले निकाली काढणार; कंपनी देणार 6.5 अब्ज डॉलर्सची भरपाई

CSK Playoffs Scenario : CSKवर टांगती तलवार... प्ले-ऑफमध्ये जाण्यासाठी उरला एकच रस्ता; अन्यथा टॉप-4 मधून पत्ता कट

Navi Mumbai Crime: उरण मधील महिलेच्या हत्या प्रकरणात दुसरा आरोपी अटकेत, वय फक्त १९ वर्ष

SCROLL FOR NEXT