crime esakal
उत्तर महाराष्ट्र

Nandurbar Bribe Crime : सफाई कामगार,चालकानेच घेतली 10 हजाराची लाच!

सकाळ वृत्तसेवा

Nandurbar Bribe Crime : जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देण्याच्या मोबदल्यात नंदुरबार आगारातील चालकाकडून १० हजाराची लाच स्वीकारताना सफाई कामगार व खासगी वाहन चालकाला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे.

धानोरा ग्रामीण रूग्णालयाचा सफाई कामगार जयेश शंकर तेजी याने लिपिक असल्याचे भासवून एका खासगी वाहन चालक तुकाराम भिला भोई याच्या मदतीने बस आगारातील ५५ वर्षीय व्यक्तीकडून १२ हजाराची लाचेची मागणी केली. ( sweeper and driver took bribe of 10,000 nandurbar news )

रनाळे खुर्द पो.भादवड ता.नंदुरबार येथील तक्रार हे मे २०२३ पासून प्रकृतीच्या कारणास्तव वैद्यकीय रजेवर होते. त्यांची प्रकृती आता सुधारल्याने त्यांना नोकरीवर हजर व्हायचे होते.

यासाठी जिल्हा रूग्णालयातील फिटनेस प्रमाणपत्राची आवश्यकता असल्याने नंदुरबार जिल्हा रूग्णालयात कार्यपद्धती जाणून घेण्यासाठी गेले असता यादरम्यान जयेश शंकर तेजी याने त्यांच्याशी संपर्क साधला असता मी जिल्हा रूग्णालयात लिपिक असल्याचे भासवून तसेच त्याचा साथीदार तुकाराम भोई हा डॉक्टर आहे.

असे भासवून देत जिल्हा रुग्णालयातून फिटनेस प्रमाणपत्र मिळवून देतो त्या बदल्यात त्यांनी १२ हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीअंती १० हजारांत ठरले असता पंचांसमक्ष लाच स्वीकारत असताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून धानोरा येथील सफाई कामगार जयेश तेजी व खासगी वाहनचालक तुकाराम भोई या दोघांना ताब्यात घेतले.

ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधीक्षक राकेश चौधरी, सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक माधवी वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक समाधान वाघ, हवालदार विलास पाटील, देवराम गावित, अमोल मराठे, विजय ठाकरे, महिला पोलिस हवालदार ज्योती पाटील, संदीप नावाडेकर, मनोज अहिरे यांच्या पथकाने केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NEET Paper Leak: नीट पेपर फुटीच्या प्रकरणात पंतप्रधानांनी घातलं लक्ष; 'पीएमओ'तील अधिकाऱ्यांची उच्चस्तरीय बैठक, आता हवाई दलाची घेणार मदत...

Ratnagiri Weather : रत्नागिरीत पुढील 3 दिवस कसं असेल हवामान? समुद्र खवळल्याने मच्छीमारांनी नौका घेतल्या किनाऱ्यावर, दिवसभर ढगाळ वातावरण

Property Tax : मिळकतकर वसुलीने गाठला १००० कोटीचा टप्पा

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

SCROLL FOR NEXT