उत्तर महाराष्ट्र

शिक्षक भरती आता नवीनच वर्षात

प्रशांत बैरागी

नामपूर (जि. नाशिक) : राज्य सरकारने शिक्षक भरतीसाठी कार्यान्वित केलेल्या पवित्र पोर्टलमध्ये सुमारे पावणेदोन लाख डी.एड., बी.एड.धारकांनी नोंदणी केली आहे. आता शैक्षणिक संस्थांना बिंदू नामावलीची नोंदणी करण्यासाठी तिसऱ्यांदा 15 नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. भरतीप्रक्रियेच्या प्रशासकीय कामकाजासाठी बराच कालावधी लागणार असल्याने उमेदवारांना नवीन वर्षाची वाट पाहावी लागणार आहे. 

राज्यातील महापालिका, नगरपालिका, नगर परिषद, जिल्हा परिषद या शासकीय संस्थांबरोबरच खासगी अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये 2010 पासून शिक्षक भरती बंद आहे. शिक्षकांच्या रिक्त पदांमुळे विद्यार्थ्यांचे होणाऱ्या शैक्षणिक नुकसानाची सरकारने गांभीर्याने दखल घेतली आहे. पारदर्शक पद्धतीने शिक्षकांना नोकऱ्या मिळाव्यात, यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी पवित्र पोर्टलद्वारे शिक्षक भरती करण्याचा निर्णय 20 जूनला घेतला होता. मात्र, काही खासगी शिक्षण संस्थांनी या प्रक्रियेला विरोध करीत त्याविरोधात न्यायालयात धावही घेतली आहे. पवित्र पोर्टलमुळे राज्यातील 20 हजार बेरोजगार तरुणांना शिक्षक सेवकपदाची लॉटरी लागणार आहे. 

शंभर दिवसांचा कालावधी 

सरकारच्या पोर्टलवर नोंद झालेल्या बिंदू नामावलीची शिक्षणाधिकाऱ्यांमार्फत तपासणी होणार आहे. ती पूर्ण झाल्यानंतर शैक्षणिक संस्थांना पोर्टल, तसेच दोन स्थानिक वर्तमानपत्रांत शिक्षक भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचे बंधन घालण्यात आले आहे. यानंतर पाच दिवसांत अंतिम निवडप्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

निवड झालेल्या उमेदवारांना तीन दिवसांत कागदपत्रांची पडताळणी करावी लागणार आहे. त्यानंतर त्यांना दहा दिवसांमध्ये नियुक्तिपत्र मिळणार आहे. उमेदवाराला रुजू करून घेतल्याची ऑनलाइन नोंदणी संस्थेला पोर्टलवर करावी लागणार आहे. ही सर्व निवडप्रक्रिया पूर्ण करण्यासाठी किमान 100 दिवसांचा कालावधी लागणार आहे. 

शिक्षक भरती... 

20 हजार 
एकूण रिक्त जागा 

1 लाख 78 हजार 
एकूण उमेदवार 

15 नोव्हेंबर 
रोस्टर नोंदणी अंतिम मुदत 

114 
नोंदणी झालेल्या संस्था.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shah Fake Video: अमित शाहांच्या Edited व्हिडिओबाबत दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई, गृहमंत्रालयाच्या तक्रारीवरून FIR दाखल

New Zealand squad T20 WC24 : टी-20 वर्ल्ड कप 2024 साठी संघाची घोषणा! 'हा' खेळाडू सांभाळणार कर्णधारपदाची धुरा

Israel-Hamas War: शस्त्रसंधीच्या चर्चा सुरू असतानाच इस्राइलने गाझामध्ये डागली क्षेपणास्त्रे; हल्ल्यात 13 जणांचा बळी, कित्येक जखमी

Chhattisgarh Accident News: कार रस्त्यावर उभी असताना पिकअपची धडक अन्.... भीषण अपघातात ८ ठार, मृतांमध्ये 3 लहान मुलांचा समावेश

Ruturaj Gaikwad CSK vs SRH : ऋतु बहरला, देशपांडेही चमकला; सीएसकेनं बालेकिल्ला परत मिळवला!

SCROLL FOR NEXT