satana
satana 
उत्तर महाराष्ट्र

मांडूळाच्या तस्करीच्या प्रयत्नातील अभियांत्रिकीचे तिघे विद्यार्थी तुरुंगात

सकाळवृत्तसेवा

सटाणा - अभ्यास करण्याऐवजी मांडूळ तस्करीच्या मार्गातून लाखो रुपये कमविण्याच्या नादात अभियांत्रिकीच्या तिघा विद्यार्थ्यांना तुरुंगाची हवा खावी लागली. जागतिक बाजारपेठेत लाखो रुपयांची किंमत मिळत असल्याचे यु ट्यूब वरील एका व्हिडीओत पाहिले आणि मांडूळ तस्करीतून झटपट श्रीमंत होण्याच्या प्रयत्नातील या तिघांना सटाणा पोलिसांनी काल गुरुवार (ता.१८) रोजी अटक केली. तिघांकडून दोन तोंडांचे एक मांडूळ जप्त करण्यात आले.

सटाणा वनविभागाचे परिक्षेत्र अधिकारी रमेश साठे यांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील राधाई लॉजवर मांडूळ सापाची अवैध विक्री करण्याच्या तयारीत काही तस्कर असल्याची गोपनीय माहिती सटाणा पोलिसांना मिळाली होती.सटाणा पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले,पोलीस उपनिरीक्षक गणेश बुवा,पोलीस हवालदार कैलास खैरनार,विजय वाघ,योगेश गुंजाळ,जिभाऊ बागुल यांनी राधाई लॉजवर छापा टाकला.छाप्यात यश संजय निकम (रा.आराई ता.सटाणा) व मयूर नागेश सोनवणे (रा.साक्री) यांची विचारपूस करून त्यांच्याजवळ असलेल्या पिशवीची झडती घेतली असता त्यांच्याजवळ मांडूळ जातीचा सर्प आढळून आला.पोलिसांनी दोघांकडे सखोल चौकशी केली असता यश निकम याचा मामा स्वप्नील दादासाहेब पगार (रा.आघार खुर्द ता.मालेगाव) यांच्याकडून मांडूळ मिळाल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. पोलिसांनी स्वप्नील पगार यालाही ताब्यात घेत वनविभागाच्या हवाली केले आहे.अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी हे कृत्य केल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.वन्य जीवन संरक्षण कायद्यानुसार मांडूळ बाळगणे अथवा त्याची तस्करी करणे हे कायद्याने गंभीर गुन्हा असल्याचे वनपरिमंडळ अधिकारी डी.एस.केसकर यांनी सांगितले.

आरोपींवर भारतीय वन्यजीव संरक्षण कायद्या अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उद्या शुक्रवारी (ता.१९) रोजी तिघा आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार आहे.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

DC vs MI : गोलंदाजीतली 'गळती' मुंबईच्या मुळावर; बॅटिंगमध्ये फर्स्ट क्लास तर बॉलिंगमध्ये नापास

Jolly LLB 3 : आता रंगणार जॉली विरुद्ध जॉली केस; सिनेमाच्या शूटिंगबाबत महत्त्वाची अपडेट आली समोर

Google वर जाहिराती करण्यासाठी भाजपने खर्च केले 100 कोटी; BJP पहिल्या स्थानावर तर काँग्रेस कितव्या स्थानावर? वाचा सविस्तर...

CM Yogi Aadityanath : ''काशी अन् अयोध्येनंतर आता मथुरेकडे प्रस्थान...'' योगी आदित्यनाथांचे स्पष्ट संकेत

Onion Export: केंद्रानं खरंच कांदा निर्यातबंदी उठवली की केवळ निवडणूक जुमला? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT